शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ऑक्सिजन वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:51 IST

कळंबोली रेल्वे स्थानकावर तयारी सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/  कळंबोली : काेरोना रुग्णसंख्या वाढत असून, उपचारासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी वाढत आहे. दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीसाठी रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस चालविणार आहे. काेराेनाग्रस्तांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे.रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून ही वाहतूक अधिक वेगवान हाेऊ शकते. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजनची वाहतूक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का, याची चाचपणी केली. त्यानुसार आता फ्लॅट वॅगन्सवर ऑक्सिजन टँकर ठेवून रोरो वाहतूक करण्यात येणार आहे. या राे राेसाठी विशिष्ट उंचीचे टँकर राज्याच्या परिवहन विभागाकडून पुरविण्यात येणार आहेत. माेकळे टँकर कळंबाेळी आणि बाेईसर रेल्वे स्थानकातून वॅगन्सवर चढविण्यात येतील.ऑक्सिजन साठा टँकरमध्ये भरुन आणण्यासाठी विजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथे पाठविले जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्थानकात यासाठी गेल्या दोन दिवसापासून ट्रॅक बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर टँकर चढवण्यासाठी मातीचा भराव करत ट्रॅक उंचीचा रॅम्प तयार करण्यात आला आहे . १५ टन रिकामे असलेले टँकर कळंबोली येथून विशाखापट्टणमसाठी सोमवारी रवाना होणार आहेत.

ऑक्सिजन टँकर चढ उतारासाठी विशेष ट्रॅकविशाखापट्टणम येथे रेल्वेमार्फत राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेले टँकर नेण्यासाठी कळंबोली रेल्वे स्थानकावर सलग ४८ तास काम सुरु ठेवून प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी १६ टन क्षमतेचे १५ टँकर विशेष ट्रेनवर चढवण्यात येणार आहेत. ट्रेनवर ३२ टँकर जाऊ शकतात . सध्या तरी १५ टँकरचे नियोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅंकर्सची विशिष्ट रचनाकाही ठिकाणी रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलांची उंची, ओव्हरहेड वायर इत्यादींचा विचार करुन ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टॅंकरची रचना करण्यात आली आहे. या टॅंकरची उंची ३३२० मिमि आहे. ते १२९० मिमि उंची असलेल्या सपाट वॅगन्सवर ठेवण्यात आले आहेत. त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी, यादृष्टीने विविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या हाेत्या. बाेईसर येथेदेखील चाचणी घेण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या