शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

इंडिया आघाडी-महायुतीत थेट लढत, कोण करणार रायगड सर? अनंत गीते-सुनील तटकरे आमनेसमाने

By राजेश भोस्तेकर | Updated: April 4, 2024 13:16 IST

Raigad lok sabha constituency: पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाच वर्षांने आलटून पालटून विजयी झेंडा फडकला जात होता. २००८ नंतर कुलाबाचा रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला.

-राजेश भोस्तेकरअलिबाग - पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाच वर्षांने आलटून पालटून विजयी झेंडा फडकला जात होता. २००८ नंतर कुलाबाचा रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर २००९, २०१४ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता. शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले होते. २०१९ ला मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले. यावेळी इंडिया आघाडी-महायुतीत थेट लढत होत आहे. त्यामुळे रायगडचा किल्ला कोण सर करणार, याबाबत उत्सुकता आहे. 

गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. रायगडचीही समीकरणे बदलली आहेत. यंदा इंडिया आघाडीकडून उद्धवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्य सुनील तटकरे हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 

एकेकाळी काँग्रेस, शेकापचे वर्चस्वएकेकाळी या मतदारसंघावर काँग्रेस आणि शेकापचे वर्चस्व होते. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी सर्वाधिक सहावेळा कुलाबा आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. ‘शेकाप’ने पाचवेळा तर शिवसेनेने दोनवेळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा येथे प्रतिनिधित्व केले आहे.आधी सोबत, आता विरोधात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप अशी महाआघाडी तर शिवसेना, भाजप युती अशी लढत झाली होती. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आता महायुतीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, भाजप अशी महायुती झाली आहे. तर शेकाप, उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, अशी इंडिया आघाडीची मोट आहे. २०१९ मध्ये जे सोबत होते, आता ते वेगळे झाले आहेत. जे विरोधात होते ते एकत्र आले आहेत. त्यामुळे लढत रंगतदार होणार आहे.अनिल तटकरे विरोधातसुनील तटकरे यांचे मोठे बंधू माजी आमदार अनिल तटकरे यांच्याकडे शरद पवार गटाचे राज्याचे उपाध्यक्षपद दिले आहे. त्यामुळे ते सुनील तटकरेंच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 

भाजपही होती इच्छुकरायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची भाजपतर्फे पूर्ण तयार झाली होती. शेकापमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार धैर्यशील पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीही वरिष्ठ पातळीवर भाजपला रायगडची जागा मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ही जागा मिळाली. 

 

टॅग्स :raigad-pcरायगडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीते