शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

अपक्ष घेतात विजयी मार्जिनपेक्षा अधिक मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:20 IST

लोकमत स्पेशल रिपोर्ट । नामसाधर्म्याच्या उमेदवारांची खासी क्लृप्ती

अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविण्याच्या परंपरेस सन १९८० च्या लोकसभा निवडणुकीत रतिलाल शहा यांनी प्रारंभ केला. त्यांना केवळ ०.६८ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर सन १९८४ मध्ये दोन, १९८९ मध्ये तीन, १९९१ मध्ये सहा, १९९६ मध्ये बारा, १९९८ मध्ये एक, १९९९ मध्ये एक, २००४ मध्ये एक, २०१४ मध्ये दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

१९८०च्या लोकसभा निवडणुकीत सुरू झालेली अपक्ष उमेदवार परंपरा पुढे अबाधित राहिली. १९८४ मध्ये कृष्णा गायकवाड आणि विलास तुपे अपक्ष उमेदवार होते. १९९१ मध्ये सहा अपक्ष उमेदवार होते, त्यांना एकूण ३१ हजार ८५५ मते मिळाली तर विजयी उमेदवाराचे मार्जिन ३९ हजार ७०६ मतांचे होते. १९९६ मध्ये १२ अपक्ष उमेदवार होते, त्यांना एकूण १८ हजार २0९ मते मिळाली तर त्यापैकी तीन दत्ता पाटील नामसाधर्म्याच्या उमेदवारांना ७ हजार १५० मते मिळाली आणि काँग्रेसचे बॅ.ए.आर.अंतुले ४ हजार ७ अशा मार्जिनने विजयीझाले होते. १९९८, १९९९, २००४ मध्ये प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार होता.

२०१४ मध्ये दोन अपक्ष उमेदवार होते त्यापैकी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील श्याम तटकरे रिंगणात होते. त्यांना ९ हजार ८४९ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा शिवसेनेचे गीते यांच्याकडून केवळ २११० मतांनी पराभव झाला.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे सुनील सखाराम तटकरे व सुनील पांडुरंग तटकरे असे दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.