शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:30 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती.

आविष्कार देसार्ई अलिबाग : बहुचर्चित असणारा रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार की रत्नागिरी जिल्ह्यात आल्या वाटेने पुन्हा परत जाणार या शक्यतेने मात्र गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाचे बस्तान बसले नाही तर रायगडच्या विकासाला खीळ बसणार आहेच शिवाय ‘व्हेंडर डेव्हलपमेंटवर’ विपरीत परिणाम होऊन आधीच हाताला तेल लावून बसलेल्या गुंतवणूकदारांसह काही राजकीय नेत्यांना हात चोळत बसण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे सध्या चित्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार अशी अटकळ लावली जात होती. त्यामुळे विविध गुंतवणूकदारांना या ठिकाणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय समोर आला. त्यानुसार या ठिकाणच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांनी बऱ्यापैकी उसळी मारण्यास सुरुवात केली होती, मात्र याच कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले. रिफायनरी प्रकल्प हा नाणारमध्येच करावा अशी मागणी आता रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार आणि काही राजकीय नेत्यांच्या चिंतेमध्ये भर घातली आहे.

हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आल्यास रायगडवासीयांना विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते प्रकल्पाच्या उद्घाटनाची फीत कापून झाल्यानंतर भरभराटीला येणाºया व्हेंडर डेव्हलपमेंटवर (विक्रेता विकास) विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. विक्रेता विकासाच्या साखळीमध्ये विविध कामगार, ठेकेदार, बांधकाम साहित्य पुरवणारे, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, हॉटेल व्यावसायिक, मनुष्यबळ पुरवणारे, वकिली व्यवसाय करणारे, कर सल्लागार, हॉस्पिटल, छोटी-मोठी किराणा विक्रीची दुकाने अशा घटकांचा समावेश होतो. त्यामुळे यातील सर्वच उद्योग जन्माला येण्याआधीच भुईसपाट होणार असल्याने उद्योग जगतात चिंतेचे ढग दाटले आहेत.

प्रकल्प न आल्याने काही राजकीय नेत्यांना ठेके मिळणार नाहीत तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही त्यांना आता हात धुवून घेता येणार नाही. त्यामुळे हात चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची जोरदार चर्चा आहे.सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले

प्रकल्प या ठिकाणी आला नाही तर गुंतवणूकदार आणि राजकीय नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागणार आहेच शिवाय प्रकल्पावर आधारित सर्व घटकांना फटका बसणार असल्याचे दिसून येते. प्रकल्प येण्याच्या शक्यतेने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी स्वारस्य दाखवणाऱ्यांनी जमिनीची मोजणी, सातबारा उतारा, सर्च रिपोर्ट, जागेचे नकाशे याची जमवाजमव करायला सुरुवात केली होती. मात्र आता रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत जाणार या शक्यतेने सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले टाकण्यात येत असल्याचे बोलले जाते.

तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या भारतातील तीन पेट्रोलियम कंपन्या आणि सौदी अरेबियातील अरम्को कंपनी रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीचा सहभाग असल्याने स्वाभाविकच रायगड जिल्ह्यातील जमिनींना कोट्यवधी रुपयांचा दर मिळणार आहे. परंतु लवकरच येथे नवीन प्रकल्प येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना निराश होण्याचे अजिबात कारण नसल्याचे एका गुंतवणूकदार कंपनीच्या अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडInvestmentगुंतवणूक