शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

पनवेलमधील सिडको वसाहतीतील पाणीपट्टीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 01:00 IST

पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत.

कळंबोली : लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. दोन महिन्यांपासून उत्पादन ठप्प झाल्याने काहींच्या वेतनातही कपात करण्यात आल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीतील पाणीबिलात ३० टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊन दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत. पनवेल महापालिका स्थापन झाली असली, तरी वसाहतीतील सुविधांसाठी शहरी नोड सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका, यांच्याकडून सिडको पाणी विकत घेते. तर तेच पाणी सिडको वसाहतींना पुरवठा करते. लॉकडाउन काळात सिडकोने पाणीबिलात ३० टक्के वाढ केली आहे.रहिवासी वापरातील सदनिकाधारकांना दर महिन्याला २० हजार लीटर पाण्यासाठी पावनेपाच रुपये प्रतियुनिट आकारले जात होते. आता सहा रुपये आकारण्यात येत आहेत. २० ते २७ हजार लीटर पाण्यासाठी आधी सहा रुपये घेतले जात होते. त्यात आता दोन रुपयांनी वाढ करून आठ रुपये केले आहे. २७ ते ३६ हजार लीटर पाण्यासाठी ७ रुपये दर होता. आता तो १० रुपये करण्यात आला आहे. ३६ ते ४२ हजार लीटर पाण्यासाठी प्रतियुनिट २० रुपये आकारले जाणार आहे. त्याचबरोबर वाणिज्य वापरासाठी आधी हजार लीटरसाठी प्रतियुनिट ३५ रुपये आकारले जात होते. आता १० रुपये वाढवण्यात आले असून प्रतियुनिट ४५ रुपये भरावे लागणार आहे. शैक्षणिक संस्थांसाठी १४ रुपये प्रतियुनिट होते तर आता १८ रुपये केले आहे.कोरोनामुुळे आधीच नागरिक हतबल झाले आहेत. अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या पगाराला कात्री लागली आहे तर काहींचे पगार अद्याप झालेले नाहीत, त्यामुळे जमापुंजी खर्ची पडत आहे.पाणीदर (प्रतियुनिट रुपयांत )पूर्वीचे वाढीव२० हजार लीटर ४.४५ ६२० ते २७ हजार लीटर ६ ८२७ ते ३६ हजार लीटर ७ १०३६ ते ४२ हजार लीटर १० २०वाणिज्य वापरासाठीहजार लीटरसाठी ३५ ४५शैक्षणिक संस्था १४ १८सिडकोने पाणीदरात वाढ करून ३१ मेपर्यंत भरण्यास सांगितल्याने रहिवाशांच्या तोंडचे पाणीच पळाले.पाणीपट्टीची दरवाढ मार्चपूर्वीच करण्यात आली आहे. ती देयके आता पाठवण्यात आली आहेत. लॉकडाउनच्या परिस्थितीची जाणीव आहे. मात्र, आम्हालाही पाणी विकत घ्यावे लागते. पाणीबिलात झालेली वाढ रद्द करण्याबाबत रहिवाशांकडून मागणी केली जात आहे, तसे वरिष्ठांना कळवले आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.- गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा सिडको.

 

टॅग्स :panvelपनवेल