शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 01:19 IST

चौक्या उभारून वाहनांची तपासणी : मद्यपी, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर

अलिबाग : जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर नाताळ सणापाठोपाठ आता थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि माथेरान पर्यटकांनी चांगलेच फुलले आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मद्यपी आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

नाताळ सण आणि थर्टीफर्स्ट म्हणजेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांनाच अधिक पसंती देतात. बुधवारी नाताळ सणाचे सेलिब्रेशनही चांगलेच धुमधडाक्यात साजरे केल्यानंतर आता नववर्षाच्या स्वागताची चाहूल लागली आहे. मुंबई-पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. येथील विस्तृत समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरत असल्याने येथील गर्दीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हॉटेल, रेस्टारंट, लॉजिंग, रिसॉर्ट पर्यटकांनी चांगलेच हाउसफुल्ल झाले आहेत.

मुंबईसह पुण्यातील पर्यटक त्याचप्रमाणे राज्य आणि परराज्यातील शैक्षणिक सहलीही दररोज दाखल होत असल्याने मुंबई-गोवा, मुंबई-पुणे या महामार्गावर प्रचंड गर्दी होत आहे. विशेषत: मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बºयाच कालावधीपासून धिम्या गतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. शिवाय, वाहतूककोंडीचाही सामना करावा लागत आहे. या प्रमुख मार्गावरील वाहतूक सुरळीत राहवी, यासाठी वाहतूक पोलीस, बिट मार्शल तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वेडीवाकडी वाहने चालवणे, अवैधरीत्या पार्किंग करणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, ओव्हर स्पीड वाहन चालवणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध चेकपोस्टवर तसेच विविध मार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये नियम मोडणाºयांवर कारवाई करण्यात येत असल्याचे वराडे यांनी सांगितले..२४ तासांत ३३५ जणांवर कारवाईच्गेल्या २४ तासांमध्ये २८ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनीवाहतुकीचे नियम भंग करणाºया एकूण ३३५ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.च्त्यांच्याकडून तब्बल ८० हजार रुपयांचा दंडही वसूल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतिउत्साही आणि तळीराम पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.च्आपल्या अतिउत्साही जल्लोषाने दुसºयांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी केले.समुद्रकिनाºयांवर पोलीस मदतकक्षच्नाताळच्या सुट्टींनतर शनिवार आणि रविवारी त्यानंतर थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत, तर काही पर्यटक शनिवार, रविवारी दाखल होणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनीही आकर्षक पॅकेजसह विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. डीजे, डिस्कोची सोय पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रकिनाºयांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक समुद्रकिनाºयांवर पोलीस मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Raigadरायगड