शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:16 IST

तालुक्यात गुन्ह्यांची मालकी जोर धरत आहे. किरकोळ गुन्ह्यासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष सापते श्रीवर्धन : तालुक्यात गुन्ह्यांची मालकी जोर धरत आहे. किरकोळ गुन्ह्यासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकताच महिला वर्गाने पोलीस यंत्रणेच्या विरोधात काढलेल्या मोर्चाने श्रीवर्धनचे समाज मन ढवळूननिघाले आहे. मात्र, यामुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीचे संरक्षण पोलीस यंत्रणा करू शकत नाही? चोरीची मालिका निरंतर चालू आहे तरी पोलीस काहीच करत नाहीत का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.श्रीवर्धन पोलिसांनी १४८ घडलेल्या गुन्ह्यांपैकी १३१ गुन्हे उघड केले. उर्वरित १८ गुन्ह्यांचा शोध चालू आहे. सध्याच्या घरफोडीचा विचार करता श्रीवर्धनची आजची लोकसंख्या व भौगोलिक रचना महत्त्वाची आहे. संपूर्ण शहरात नारळ व सुपारीच्या वाड्या मोठ्या स्वरूपात आहेत, तसेच बंद घरांची संख्या काही भागात जास्त आहे. पोलीस यंत्रणेने मुख्य रस्त्यावर गस्त दिली तरीसुद्धा नारळ-सुपारीच्या वाड्यांचा व रस्त्याचा वापर भुरटे चोर करतात. श्रीवर्धन शहरात ४७६८ घरे आहेत. शहराची लोकसंख्या १५१२३ असल्याची माहिती नगरपालिकेकडून मिळाली.श्रीवर्धन पोलीस ठाण्यात चार अधिकारी ५१ कर्मचारी मंजूर असून, प्रत्यक्षात हजर पोलीस अधिकारी २, तर पोलीस कर्मचारी ३६ आहेत. अत्यावश्यक कामगिरीकरिता नेमण्यात येणारी संख्या २७ तर शिल्लक फक्त ५ आहेत.श्रीवर्धनच्या लोकसंख्येचा विचार करता पोलीस यंत्रणेचे मनुष्यबळ फारच कमी असल्याने येथे पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.श्रीवर्धनमधील जनतेने भयमुक्त राहावे, चोर लवकरच पकडले जातील, महिलावर्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारक्षेत्राचा वापर करत काढलेल्या मोर्चांचा व त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, असे श्रीवर्धन पोलीस स्टेशन परशुराम कांबळे यांनी सांगितले असून, चोरीच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा