जयंत धुळप, अलिबागगेल्या काही दिवसांपासून परिसरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. त्यात हुंड्यासाठी छळवणूक, लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचा विनयभंग आदी घटनांचा समावेश आहे. माहेरून पैसे आणण्यासाठी सतत छळ करुन चारित्र्यावर संशय व्यक्त करुन सतत मारहाण केल्याप्रकरणी पेण तालुक्यातील उर्णोली गावातील विवाहिता प्रिया प्रवीण पाटील यांनी आपला पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध रीतसर फिर्याद दाखल केल्यावर, दादर सागरी पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन प्रिया प्रवीण पाटील यांचा पती प्रवीण रामचंद्र पाटील, सासरा रामचंद्र गणपत पाटील आणि सासू पार्वती गणपत पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रिया प्रवीण पाटील यांचा ८ मे २०१४ रोजी प्रवीण रामचंद्र पाटील यांच्याशी रीतसर विवाह झाल्यावर, विवाहानंतर काही दिवसांतच त्यांचा छळ सुरु करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.गेल्या मे २०१४ पासून १७ आॅगस्ट २०१४ पर्यंत सतत शारीरिक व मानसिक छळ, तर गेल्या १७ आॅगस्ट रोजी पती वैभव विलास जंगम याने वेताच्या काठीने बेदम मारहाण केली तर सासू विजया विलास जंगम हिने आपले केस धरुन सासरा विलास गोपाळ जंगम याने पोटात लाथा मारल्यावर घाबरुन रोहा येथील आपल्या माहेरी जावून विवाहिता दीपाली वैभव जंगम यांनी रोहा पोलिसांत या प्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली. दीपाली जंगम यांचे सासर अलिबाग तालुक्यात मुळे या गावी असल्याने रोहा पोलिसांनी ही तक्रार चौकशी व पुढील कारवाई करिता अलिबाग पोलिसांकडे पाठविली. अलिबाग पोलिसांनी चौकशी करुन दीपाली जंगम याचा पती वैभव, सासरा विलास व सासू विजया विलास जंगम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महिलांशी निगडित गुन्ह्यांमध्ये वाढ
By admin | Updated: September 10, 2014 23:28 IST