माणगाव : बलात्कार आणि धमकी प्रकरणात इनायत हुर्जुकला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इनायत हुर्जुकच्या विरोधात एका तरु णीने २०१२मध्ये शीतपेयातून गुंगी आणणारे औषध मिसळून आपल्यावर अत्याचार करून त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून ती इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची तक्र ार महाड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर महाड पोलिसांनी इनायत हुर्जुकच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी महाड पोलिसांनी सप्टेंबर २०१६ मध्ये अटक केली होती. इनायत हुर्जुक यांनी जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. निकाल देताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी तक्र ारदार ही सज्ञान असून तिने पोलिसांकडे जाण्यास उशीर का केला याचा खुलासा होत नाही, तसेच जबाबाशिवाय इतर कोणताही पुरावा तक्र ारदार यांनी दिलेला नाही. या कारणास्तव इनायत हुर्जुकला ३० हजार रु पये जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे आदेश दिले.
इनायत हुर्जुकला जामीन मंजूर
By admin | Updated: February 17, 2017 02:16 IST