शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय पात्र फाऊंडेशनच्या 68व्या स्वयंपाकघराचे उदघाटन; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 21:48 IST

ना नफा ना तोटा आधारावर अक्षयपात्र काम करीत असून त्यांचे जेवणही अत्यंत दर्जेदार असते.

पनवेल: अक्षय पात्र फाऊंडेशच्या देशातील 68 व्या स्वयंपाक घराचे उदघाटन दि. 3 रोजी पनवेल मधील साईनगर याठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल मधील हे  नवीन सेंट्रलाइज्ड किचन आहे.देशातील 68 वे आणि महाराष्ट्रातील हे चौथे स्वयंपाकघर आहे.      

याद्वारे 70 शाळांमधील वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय  पोषण आहार दिला जाणार आहे. या उदघाटन सोहळ्याला  उद्घाटनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अक्षय पात्र फाऊंडेशन अध्यक्ष अमितासना दासा, श्रीधर वेंकट उपस्थित होते.पनवेल मधील या स्वयंपाक घरात दररोजवीस हजारांचे जेवण तयार केले जाणार आहे.  सुरुवातीला दहा  माध्यान्ह भोजन महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना दिले जाईल.अक्षयपात्र संस्थेचे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे असे हे स्वयंपाक घर असणार आहे.यावेळी बोलताना केसरकर यांनी अक्षयपात्र संस्थेचे कौतुक केले.

ना नफा ना तोटा आधारावर अक्षयपात्र काम करीत असून त्यांचे जेवणही अत्यंत दर्जेदार असते.पनवेल मधील या स्वयंपाक घरात शंभर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने त्याबाबत देखील केसरकर यांनी संस्थेचे अभिनंदन केले.अक्षयपात्र संस्थेचे कौतुक स्वतः देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केले असल्याने त्यापेक्षा आणखी मोठी पोचपावती काय असेल असेहि गौरोद्गार यावेळी केसरकर यांनी काढले.   चौकट - दोन कोटी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न  राज्यात दोन कोटी मुले शाळेत शिक्षण घेत आहेत.त्यांचा दफ्तरांचा ओझा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि आधुनिक शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.स्वच्छ शाळा ,सुंदर शाळा हा उपक्रम आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनात राबवत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Raigadरायगडpanvelपनवेल