शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:28 IST

प्राथमिक विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे जिल्हा परिषद प्रशासन फक्त आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे.

अलिबाग : प्राथमिक विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे जिल्हा परिषद प्रशासन फक्त आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. या आधी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न सोडवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या ४३ दिवसांमध्ये एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शुक्रवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले आहे.शिक्षकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी १६ आॅक्टोबर २०१८ रोजी रायगड जिल्हा परिषद प्रशासनासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आाणि रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेत लाक्षणिक उपोषण करण्याआधी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. तसेच ३० आॅक्टोबर २०१८ पर्यंत प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन देऊन उपोषण न करण्याचे आवाहन केले होेते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन स्थगित केले होते; परंतु गेल्या ४३ दिवसांमध्ये एकाही प्रश्नाची सोडवणूक करण्यात आली नसल्याने संघटनेने शुक्रवारी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.>शिक्षकांच्या मागण्याआंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही. त्यांना कार्यमुक्त करावे, गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेला वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात यावा.प्राथमिक शिक्षकांना स्थायी ‘अ’ प्रमाणपत्र मिळावे, डीसीपीएस शिक्षकांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा हिशेब मिळावा, प्राथमिक शाळांना मिळणारा शालेय पोषण आहार मिळावा.इंधन खर्च, मदतनीस मानधन, चार टक्के सादील, सर्वशिक्षा अनुदान मिळणे, प्राथमिक शिक्षकांना रायगड जिल्हा परिषदेकडून फंड स्लिप मिळावी.