शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

धरण प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण

By admin | Updated: August 21, 2015 02:23 IST

वरसई पंचक्रोशीतील १३ महसुली गावे, ९ वाड्यांवरील ३,४४२ विस्थापित कुटुंबांना बाळगंगा धरण प्रकल्पाचा अंतिम निवाडा जाहीर करून जमीन व घरांचा अल्प आर्थिक मोबदला शासनाने

पेण : वरसई पंचक्रोशीतील १३ महसुली गावे, ९ वाड्यांवरील ३,४४२ विस्थापित कुटुंबांना बाळगंगा धरण प्रकल्पाचा अंतिम निवाडा जाहीर करून जमीन व घरांचा अल्प आर्थिक मोबदला शासनाने दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना समस्त बाळगंगा प्रकल्पग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे. यासाठी वाशीवली सरपंच मधुकर हादगे व अन्य चार प्रकल्पग्रस्तांनी पुढाकार घेत पेण तहसीलदार कार्यालयासमोर बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पाठिंब्याने आमरण उपोषण सुरू केले आहे.बाळगंगा धरणातून पाण्याचा व्यापार व व्यापारातून पैसा कमाविणे हाच या धरण निर्मितीचा मुख्य उद्दिष्ट आहे. यात प्रकल्पग्रस्तांचं भलं कुठेच दिसत नाही. मात्र स्वत:च्या शेतजमिनी व घरदारे यावर नांगर फिरवून शासन व्यवस्थेला संपूर्ण सहकार्य देणाऱ्या बाधितांच्या नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरून टाकावा, अशी आर्थिक परिस्थिती बाळगंगा प्रकल्पग्रस्तांची शासनाने केली आहे. सरकारी प्रकल्प व जनहितासाठी पाण्याची साठवण या साखर पेरणी व मधाचं बोट लावून शासकीय अधिकाऱ्यांनी कामे उरकून घेतली. अनेक बैठकांचा सिलसिला जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यावेळी घेऊन प्रकल्पग्रस्तांना विश्वास दिला होता. मात्र तो विश्वास ती हमी अंतिम निवाडा जाहीर झाल्यावर दिसून आली. पेण, पनवेल परिसरांत जमिनीचे दर ठरत असताना बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना एकरी (४०गुंठे) पाच ते सहा लाख एवढ्या माफक दराने २०१६ ते २०२२ या कालावधीत धरण पूर्ण होणार असल्याने घरांचे मूल्यांकन करताना २०११-१२ डीएसआर दर लावल्याने पुनर्वसनात घरबांधणी करताना सध्याचे घरबांधणी मटेरिअलचे वाढलेले भाव पाहता ही सुद्धा फसवणूक आहे. पेण परिसरात सध्या ६० ते ७० लाख रुपये एकरी भाव मिळत असताना शासकीय यंत्रणेने प्रकल्पांच्या नावाखाली व सार्वजनिक हिताचा उद्देश जाहीर करून बाळगंगा बाधितांच्या लाटलेल्या जमिनीतून सिडको अनेक वर्षे बक्कळ पैसा कमाविणार आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला मिळणार नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध म्हणून शासनाचे लक्षवेधावे यासाठी मधुकर हादगे, विकास चोरगे, किरण पाटील, भरत पाटील, संकेश बांधण हे प्रकल्पग्रस्त उपोषणास बसले आहेत. या सर्वांना आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील, पेण पंचायत समिती सदस्य बाळाराम पाटील आदींनी पाठिंबा दिला आहे.