शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी; सुरक्षेवर भर

By निखिल म्हात्रे | Updated: December 25, 2022 13:01 IST

अतीउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.

अलिबाग : ख्रिसमस साजरी करण्यासाठी व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटन केद्रांवर हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. या संधीचा फायदा घेऊन हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

रायगड मधील अलिबाग, मुरुड, काशिद, किहीम, हरीहरेश्वर, माथेरान, कर्नाळा अभयारण्य अशा आदी ठिकाणी पर्यटक दाखल झाले आहेत. अलिबाग आणि मुरुड परीसरात गेल्या चार दिवसात 50 ते 70 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. दिवाळी सुटीपासूनच पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु सध्या थंडीचा मोसम आणि सलग सुटय़ा असल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झालेत. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आलेत. हॉटेल, लॉजिंगचा व्यवसायही तेजीत आहे. घोडागाडीवाले, विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट्स यांचा व्यवसाय करणारे खूश आहेत. इथल्या लॉजेसनाही चांगला व्यवसाय यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे.

किनारपट्टीबरोबरच रायगड किल्ला, महड, पाली येथील अष्टविनायकांची मंदिरे, साळाव येथील बिर्ला गणेश मंदिराचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. रायगडमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. आताच्या मोसमात पर्यटकांचा हा ओघ नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत असाच कायम राहणार आहे. नाताळच्या सुट्टीमुळे व पुढे चार दिवसांनी थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठीया ठिकाणांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डिस्को, डिस्कोथेकची सोय पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षीततेसाठी समुद्र किनाऱ्यांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर पोलिस मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

अतीउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. महत्वाच्या नाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच आपल्या अतिउत्साही जल्लोषाने दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे.

जिल्ह्यात आज पासून साधारणत: 7 दिवस वास्तव्यास असणार आहेत. या दरम्यान पर्यटकांना वाहतूकीच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आली असून पोलिस यंत्रणेचा कटाक्ष असणार आहे. तर बल्लाळेश्वर व वरद-विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :tourismपर्यटन