शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल दोनशे फूट दरीत कोसळली; शिवजयंतीसाठी रायगडावर निघालेले तिघेही वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:29 IST

तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात तरुणांना यश

- सिकंदर अनवारेमहाड शिवजयंती निमित्त किल्ले रायगडवर भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने ट्रिपल सीट निघालेल्या तरुणांची मोटारसायकल माझेरी घाटात सुमारे २०० फुट दरीत कोसळली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. दरीत कोसळलेल्या तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आले आहे.महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोंगवली ता. भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवरून एक गट निघाला होता. त्यातील एका मोटारसायकलवर असलेल्या केतन देसाई 23, प्रथमेश गरुड, 25 आणि किरण सुर्यवंशी 20 यांची मोटारसायकल माझेरी घाटात खोल दरीत कोसळली. सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळल्याने जखमी झालेल्या तरुणांना बाहेर काढणे एक आव्हानच होते. मात्र स्थानिक तरुणांनी अथक प्रयत्न करत तीघांना सुखरूप बाहेर काढले. पैकी दोन जखमींना महाडच्या ग्रामीण रूगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. प्रथमेश किरकाेळ जखमी झाला. त्याला उपचार करुन साेडण्यात आले. पहाटेच्या सुमारास घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले.वरंध येथील पत्रकार विपुल देशमुख यांनी पारमाची / माझेरी पोलीस पाटील यांचा संपर्क क्रमांक त्यांचे लहान बंधू भुपेंद्र सकपाळ यांचेकडून पुणे येथून मिळवला आणि पोलीस पाटील नितीन सकपाळ यांना सदर अपघाताची माहिती दिली. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत महाड औद्योगिक पोलीस ठाण्याला खबर दिली. या जखमी तरुणांना वाचवण्यासाठी पारमाची, वरंध, माझेरी आणि उंबर्डे मधील तरुण आणि ग्रामस्थ तसेच सर्व ट्रक चालक यांनी अथक मेहनत घेतली. तरुण समाजसेवक नागेश (उत्तम) देशमुख वरंध आणि समीर सुतार पारमाचीवाडी या दोन तरुणांनी देखील जीवाची बाजी लावून जखमी तरुणांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली.