शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Narli Poornima: करंजा येथे पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 19:54 IST

Narli Poornima: उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला.

- मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांनीही सालाबाद प्रमाणे आपला पारंपारीक सण साजरा केला.त्यात त्यांनी प्रतिकात्मक सोनेरी नारळ तयार केला होता.या प्रथेप्रमाणे सोन्याच्या नारळाची पूजा करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर सजविलेल्या गाडीमध्ये तो नारळ मिरवणूकीने वाजतगाजत समुद्रकिनारी नेण्यात आला. तिथे पूजा करुन होडीने खोल समुद्रात नेऊन अर्पण केला.यावेळी  विद्यार्थ्यांनी पारंपारीक कोळ्याचा पोषाख परिधान केला होता.

यावेळी वृक्षांनाही राख्या बांधण्यात आल्या. तसेच समुद्र किनारी तयार केलेल्या स्टेजवर विद्यार्थ्यांनी कोळी नृत्यही सादर केली.काळाप्रमाणे या सणामध्येही जुन्या कोळीगीतांसह आधुनिक गीतांचेही स्वर गुंजले. पारंपारिक वाद्यांच्या जागी डॉल्बी सिस्टीमने आलीय.पद्धती बदलत चालल्यात. पण उत्साहाची कुठेच कमतरता भासली नाही.खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी करंजा येथील विद्यार्थीनीही श्रीफळ अर्पण करण्यात आला. ही बाब निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा पुढे चालण्यासाठी आशादायी आहे.नारळी पोर्णिमेच्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते.

टॅग्स :Raigadरायगड