शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना, दासगावमध्ये खिडकीतून आगीचा गोळा आला अन् बाहेर गेला, कुटुंब थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 05:36 IST

Raigad News: महाड तालुक्यातील दासगावमध्ये रिमझिम पाऊस सुरू असताना बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठ्या धमाक्यासोबत भरवस्तीत अचानक वीज कोसळली.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील दासगावमध्ये रिमझिम पाऊस सुरू असताना बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठ्या धमाक्यासोबत भरवस्तीत अचानक वीज कोसळली. यावेळी आगीचा गोळा घरातील एका खिडकीतून आत शिरून दुसऱ्या खिडकीतून बाजूने जात नारळाच्या झाडावर आदळला. यात झाड खाक झाले असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

महाड तालुक्यातील दासगाव येथे बुधवारी पावसासह विजाही चमकत होत्या. रात्री आठ वाजता अचानक येथील मोहल्ला परिसरात मोठा धमाका झाला. भीतीने नागरिक घराबाहेर पडले. भरवस्तीत घरासमोरील रस्त्यावरच वीज कोसळली. त्याठिकाणी रस्ता शुभ्र होत तडकला आणि त्याच परिसरातील इम्रान बळी यांच्या घराच्या मागच्या खिडकीतून आगीचा एक गोळा आला आणि पुढच्या खिडकीतून बाहेर पडत बाजूलाच असलेल्या नारळाच्या झाडावर गेल्याने त्या झाडाने पेट घेतला.

मी माझ्या घराच्या गॅलरीत बसले होते. अचानक आवाज होऊन आगीचा गोळा या रस्त्यावर पडला आणि तिथून पेटत समोर निघून गेला.    - ताजबी अनवारे, ग्रामस्थ 

आवाज झाला तेव्हा मी घरात होते. माझ्यासमोर घराच्या मागच्या खिडकीतून आगीचा गोळा घरात आला आणि समोरच्या खिडकीतून बाहेर गेला. काही काळ मला काही समजले नाही. या घटनेदरम्यान घरामध्ये मी आणि माझी तीन मुले होतो. आम्ही थोडक्यात वाचलो.     - साजिया बळी, ग्रामस्थ

कुटुंब बचावले;  दहशतीचे पसरले वातावरणआगीचा गोळा शिरलेल्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू जळल्या.  घरामध्ये तीन लहान मुले आणि त्यांची आई असे चार लोकांचे कुटुंब होते, ते थोडक्यात बचावले.  या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

टॅग्स :Raigadरायगड