शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही एसटी सेवा अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:32 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवशाही वातानुकूलित एसटी बससेवा येत्या काळात अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे.

अलिबाग : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवशाही वातानुकूलित एसटी बससेवा येत्या काळात अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. अलिबाग-मुंबई मार्गावर धावणाºया शिवशाही वातानुकूलित एसटी बसचा शुभारंभ गुरु वारीअ‍ॅड. पाटील यांच्या हस्ते अलिबाग एसटी बस आगारात करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.यापूर्वी मुंबई आगाराची शिवशाही बस प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-अलिबाग मार्गावर सुरू होती. आता अलिबाग आगारास शिवशाही बस मिळाल्याने आता अलिबाग-मुंबई मार्गावर ही शिवशाही बस कायमस्वरूपी चालणार असल्याचे अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव यांनी सांगितले. शिवशाही बसचे अलिबाग-मुंबई प्रवासी भाडे प्रौढांसाठी १७० रु पये व लहानांसाठी ८६ रु पये असून, एसटीच्या कोणत्याही सवलती या बसला लागू राहाणार नाहीत.पिंपळभाट, कार्लेखिंड, तीनविरा, पेझारी, पोयनाड, पेण असे थांबे असणारी ही बस अलिबाग आगारातून मुंबईकरिता सकाळी ७ वाजता व दुपारी ३ वाजता सुटेल, तर मुंबई सेंटर येथून ही बस सकाळी १०.३० वाजता व संध्याकाळी ६.४५ वाजता सुटणार असल्याचे यादव यांनी सांगितले.या वेळी अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव, वेल्फेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर्स आॅफ कोकण संस्थेचे अध्यक्ष दिलीप जोग, चेंढरे ग्रामपंचायतीचे सदस्य अजित माळी, वडगावचे सरपंच जयेंद्र भगत, एम. डी. मगर, ए. पी. अवतार, विजय म्हात्रे, गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.>अलिबाग- पुणे बसची मागणीअलिबाग-पुणे मार्गावर अशाच प्रकारे शिवशाही बसच्या गरजेबाबत या वेळी चर्चा झाली. अलिबाग-पुणे मार्गावर ही बस सुरू केल्यास शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून अलिबागेत येऊ इच्छिणाºया पर्यटकांकरिता सकाळच्या वेळेत पुण्याहून सोडल्यास ती सोईची होईल व नफ्यात चालेल. तर संध्याकाळी अलिबागहून बस सोडल्यास अलिबागेतून पुण्यास व पुण्याहून पुढे जाऊ इच्छिणाºया प्रवाशांकरिता ती अत्यंत सोईची ठरेल. या चर्चेला गांभीर्याने विचारात घेऊन ही बस सुरू करण्याबाबत आपण परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. अलिबाग सावंतवाडी व रत्नागिरी या दोन बसेस पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी दिलीप जोग यांनी केली.