शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

तलवार घेऊन आलात तर वार परतवू, आदित्य ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:05 IST

कोकणात पर्यटनास मोठी संधी आहे. त्यामुळे विविध विकास योजनेतून निधी उभारला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क माणगाव : दोन वर्ष महाराष्ट्रातील विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज खोटेनाटे आरोप करून अनाठायी बदनामी करीत आहेत. त्यांचे षडयंत्र आहे. त्यांची पोटदुखी सुरू आहे.  त्याला आम्ही भीक घालणार नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. ती तुटणे शक्यच नाही. महाराष्ट्राला दिलेली वचने आणि आश्वासने पाच वर्षात पूर्ण करून दाखवू. प्रेमाने आलात तर बाजूला बसवू. जर तलवार घेऊन आलात तर तो वार परतविण्याची ताकद आमच्यात असल्याचा घणाघात करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावले. माणगाव शहरातील जे. बी. सावंत, टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालय बामणोली रोड येथे जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.  

कोकणात पर्यटनास मोठी संधी आहे. त्यामुळे विविध विकास योजनेतून निधी उभारला जात आहे. मात्र दोन वर्षे कोविड काळात विविध माध्यमातून कोविडवर मात करण्याचे काम यशस्वीपणे सरकारने केले आहे. सध्या बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे. तसेच डिझेल, पेट्रोलचे भाव वाढत आहेत. मात्र राज्य सरकारने सीएनजीवरील टॅक्स कमी करून सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. दरम्यान, रायगडमध्ये दोन-दोन वादळे, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर या नैसर्गिक आपत्तींचा रायगडकरांनी जिद्दीने सामना केला. त्यांच्या या जिद्दीपुढे मी नतमस्तक होत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने १ हजार ४० कोटी रुपयांचे पॅकेज मदत म्हणून देण्यात आले. रायगडसाठी जूनमध्ये रोजगार मेळावा होणार  असून, रायगडला मुंबईला जोडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन वाघnआगामी निवडणुकीत या आमदारांमध्ये वाढ कशी होईल, यासाठी संघटनात्मक प्रयत्न केल्यास रायगड जिल्ह्यात सातपैकी सात आमदार निवडून येऊ शकतात. nयेत्या रायगड जि.प. निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे ध्येय ठेवूनच आतापासून कामाला लागा. nरायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच होईल, असा आत्मविश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगाव येथील शिवसेना मेळाव्यात व्यक्त केला. nत्यानंतर शिवसैनिकांनी टाळ्यांचा मोठा कडकडाट करून त्यांना दाद दिली.

टॅग्स :RaigadरायगडAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना