शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:15 IST

Karjat : कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शासनाने सुरू केलेले कोविड सेंटरमधील ५० बेड यांच्या जोडीला व्हेंटिलेटर बेड असावेत आणि आयसीयू सेंटरची मागणी पूर्ण झाली आहे.

कर्जत : शासनाच्या डेडिकेटेड कोविड सेंटरचा दर्जा कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कक्षाला देण्यात आला आहे. कोविडसाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड यांची उपलब्धता पूर्ण झाली असून, अशा आयसीयूसह व्हेंटिलेटर सेंटरचे लोकार्पण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते सोमवारी करण्यात आले.चार व्हेंटिलेटरसह आयसीयू आणि ऑक्सिजनची मध्यवर्ती सुविधा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली असून, ऑक्सिजन लिक्विड ड्युरा सेंटरही कार्यान्वित करण्यात आल्याने आता कर्जत उपजिल्हा रुग्णालयमधून एकही रुग्णाला बाहेर उपचार करण्यासाठी पाठविण्याची वेळ येऊ नये आणि यापुढे कोणत्याही रुग्णांचे आरोग्य सेवा मिळाली नाही, म्हणून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू ओढवू नये, अशी सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केली.कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शासनाने सुरू केलेले कोविड सेंटरमधील ५० बेड यांच्या जोडीला व्हेंटिलेटर बेड असावेत आणि आयसीयू सेंटरची मागणी पूर्ण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या चार व्हेंटिलेटरसह आयसीयू सेंटर आणि मध्यवर्ती ऑक्सिजन, तसेच लिक्विड ऑक्सिजन ड्युरा सेंटर यांची पूर्तता झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील पहिल्या शासनाच्या आयसीयू व्हेंटिलेटरसह डेडिकेटेड कोविड सेंटरचे लोकार्पण आज २ नोव्हेंबर रोजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर माने, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संजीव धनेगावे, डॉ. मनोज बनसोडे आदी प्रमुख उपस्थित होते.कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जत तालुक्यातील सर्व भागांतून रुग्ण येत असताना, आरोग्य विभागाच्या चुकीमुळे कोणताही रुग्ण दगवणार नाही, याचीही काळजी घेण्याची आवाहन आमदार थोरवे यांनी केले. 

बाल उपचार केंद्र : डॉक्टर आणि स्टाफ यांची रिक्त पदे भरली गेली असून, आता सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन करतानाच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी तत्काळ सुरू करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माने यांनी केली, तर तालुक्यातील कुपोषण शून्यावर आणण्यासाठी रुग्णालयमध्ये बाल उपचार केंद्र सुरू करण्याची सूचना केली.

टॅग्स :Karjatकर्जत