शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने कोसळले कारली शेतीचे मांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:06 IST

शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान : कर्जत तालुक्यातील चई येथील घटना

कर्जत : कर्जत तालुक्यातील ठाणे जिल्ह्यालगत असलेल्या भागाला वादळी वाºयासह आलेल्या पावसाने झोडपले होते. त्या वादळामुळे चई भागातील शेतकºयाचे कारले भाजी मांडव मोडून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांचे सुमारे दोन लाख रुपयांंचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी घेतलेले उसने पैसे कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.कर्जत तालुक्यातील चई भागात काही दिवसांपूर्वी वादळी वाºयासह पाऊस आला होता. त्या पावसाने त्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चई येथील शरद कान्हू शिंगोळे हे शेतकरी गेली २० वर्षे एकाच ठिकाणी कारली व भाजीपाला शेती करतात. त्यांच्या शेताजवळ असलेल्या विहिरीमधील पाणी शिंगोळे हे कावडीच्या साहाय्याने शेतापर्यंत आणतात. ते पाणी कारली पिकाला शिंपडून शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. त्यासाठी शिंगोळे हे नोव्हेंबर म्ािहन्यापासून शेतात राबण्यास सुरुवात करतात. कारली भाजीपाला शेती करण्यासाठी मांडव बनवावा लागतो, त्यासाठी लाकडे गोळा करण्यापासून बियाणे लागवड करण्यापर्यंत सर्व कामे त्यांना एकट्याला करावी लागतात. तीन महिने अंगमेहनत केल्यानंतर एप्रिल महिन्यात कारली वेलीवर येतात.शरद शिंगोळे हे दर चार दिवसांनी मुरबाड येथील बाजारपेठ गाठून १५० किलो कारल्यांची विक्र ी करून उत्पन्न मिळवितात. पूर्ण हंगामात ते किमान ५० ते ५५ वेळेस मुरबाड येथील बाजारपेठेत कारली विक्रीस नेत असतात. गेली २० वर्षे त्यांचा हा व्यवसाय आहे. या वर्षी केवळ चार वेळा शिंगोळे यांनी कारली बाजारपेठेत विक्रीस नेली होती; परंतु आता त्यांचा कारल्याचा मांडव वादळी पावसात मोडल्याने बाजारपेठेत कारली घेऊन जाणे शक्य होणार नाही. वादळी वाºयासह जोरदार पाऊस आल्याने शेतात मांडव करण्यासाठी मातीत उभे केलेले बांबू एकामोगोमाग एक कोसळून संपूर्ण मांडव कोसळून संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे.शरद शिंगोळे यांनी या शेतीकरिता ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, केवळ चार वेळा कारली बाजारपेठेत नेता आल्याने केलेला खर्च आणि चार महिने घेतलेली मेहनतही फुकट गेली आहे. मे अखेरपर्यंत कारली भाजीपाला विकून शिंगोळे किमान दोन ते अडीच लाख मिळवतात; परंतु यावर्षी वादळी वाºयासह आलेल्या अवेळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून नुकसान भरपाई मिळू शकल्यास त्यांना पुढे मार्ग काढता येणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस