शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक पाण्याच्या फुटलेल्या वाहिनीने शेकडो मासे मृत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पितळ उघडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:16 IST

मजकूर गावानजीक असलेल्या नदीच्या पात्रात पुन्हा एकदा रसायनिक पाणी मिसळल्याने शेकडो मासे व जलचर प्राणी मृत झालेले आहेत. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणा-यांवर उपासमारी ओढावलेली आहे.

शैलेश चव्हाण

तळोजा, दि. 8 - मजकूर गावानजीक असलेल्या नदीच्या पात्रात पुन्हा एकदा रसायनिक पाणी मिसळल्याने शेकडो मासे व जलचर प्राणी मृत झालेले आहेत. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणा-यांवर उपासमारी ओढावलेली आहे. तळोजात प्रदूषणाच्या वारंवार घटना घडत असतात, मात्र याबाबत प्रदूषण मंडळ कानाडोळा करून आपली वेळ मारून नेत आहे.तळोजातील एम ब्लोक या ठिकाणी असणा-या मच्छी कंपन्यांतून  वाहणारी रासायनिक पाण्याची वाहिनी तळोजा येथील जलशुद़्धी केंद्रात येते. मात्र तळोजा मजकूर या ठिकाणी असलेल्या नदीच्या पात्रात हे रासायनिक पाणी मिसळल्याने असंख्य मासे मृत झाले आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणी माहिती मिळताच नगरसेवक हरेश केणी व अरविंद म्हात्रे यांनी कोळी बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.    

प्रत्येक कारखान्यांनी आपल्या कंपन्यांतील पाणी प्रकिया केंद्रात पाठवताना ते सर्वप्रथम कंपनीतच असलेल्या प्रक्रिया केंद्रात शुद्ध करून सिईटीपीकडे पाठवायला हवे, मात्र तस न करता हे पाणी तसेच एमआयडीसीच्या वाहिन्यांमार्फत सोडले जाते हे आज फुटलेल्या वाहिन्यांमुळे सिद्ध झाले आहे. 

तर मासे वाचले असतेतळोजातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी एमआयडीसीची वाहिनी फुटली खरी, मात्र या वाहिनीतून घातक रसायनिक पाणी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया न करता वाहत असल्यानेच हे मासे मृत झाल्याचे समोर आलेले आहे. प्रदूषण मंडळाने नेहमीप्रमाणे घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र कारखान्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा त्रास वारंवार होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ एमआयडीसीकडे बोट दाखवत आहे .

प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या ठिकाणी जाऊन पाण्याचे नमुने घतलेले आहेत. लवकरच रिपोर्ट येतील, मात्र या फुटलेल्या वाहिनीतून वाहणारे पाणी विषारी होते का व याला जबाबदार कोण हे आता सांगता येणार नाही .प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी 

जयवंत हजारे

वारंवार नदीच्या पात्रात विशारी रसाायन मिसळण्याचे काम सुरु आहे कासाडी नदी नंतर आता तळोजातील ईतर नद्या दुषीत करण्याचा हा कट असुन प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र वेळ मारून नेत आहे. आज मृत झालेल्या माश्यांच्या नुकसानाची भरपाई प्रदूषण नियंत्रण मंडळांनी कोळी बांधवांना द्यावी व संबंधित कारखान्यांवर कठोर कार्यवाही करावी . नगरसेवक अरविंद म्हात्रे

एमआयडीसीच्या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, लवकरच वाहिनी पूर्ववत होईल संतोष कळसकर. तळोजा एम आय डीसी उपकार्यकारी अभियंता