शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राज समितीसाठी कोट्यवधींच्या पायघड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:31 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजावरील ५२ लेखाआक्षेपांची झाडाझडती घेण्यासाठी आलेल्या पंचायत राज समितीने फक्त दोनच तासांत बैठक गुंडाळली.

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजावरील ५२ लेखाआक्षेपांची झाडाझडती घेण्यासाठी आलेल्या पंचायत राज समितीने फक्त दोनच तासांत बैठक गुंडाळली. पंचायत राज समिती जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेली आहे. या कालावधीत ग्रामपंचायत, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रांना समिती भेट देण्याची शक्यता आहे. समितीकडून झुकते माप मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पंचायत राज समितीच्या खुशामतीत ‘कोट्यवधींच्या’ पायघड्या घातल्याचे चित्र आहे.पंचायत राज समिती म्हटले की, प्रशासनासह सत्ताधाºयांच्या उरात चांगलीच धडकी भरते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसेच संबंधित जिल्हा परिषदेचा फंड या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. विकासकामे करताना काही गैरव्यवहार, भ्रष्टाचार होणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. जिल्हा परिषदांचा कारभार सुरळीत सुुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी राज्य सरकार समिती नेमते. अशा विविध २२ समित्या कार्यरत आहेत. त्यातील पंचायत राज समिती ही तितकीच महत्त्वाची समिती आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे आहेत. त्यांच्या सोबत २७ सदस्य आणि तेवढेच अधिकारी, कर्मचारी आले आहेत.>लेखापालांकडून ५२ मुद्द्यांवर आक्षेपरायगड जिल्हा परिषदेने २०१३-१४ या कालावधीत केलेल्या कारभाराबाबत तब्बल ५२ मुद्दे लेखाआक्षेपाने अधोरेखित करण्यात आले. हे ५२ मुद्दे बांधकाम, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, शिक्षण विभाग यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे पंचायत राज समितीने मंगळवारच्या बैठकीत यावरसखोल चर्चा होण्याऐवजी सदरची बैठक फक्त दोनच तासांत गुंडाळण्यात आली. यातील महत्त्वाची बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेने पंचायत राज समितीची चांगली बडदास्त ठेवली आहे. त्यांना राहण्यासाठी अलिबाग येथील तीन तारांकित हॉटेलमध्ये सोय केली आहे. मॅपल आयव्ही हॉटेलमधील एका दिवसाचे भाडे तब्बल साडेसहा हजार रुपयांच्या आसपास आहे, तर रविकिरणचे सुमारे साडेतीन ते चार हजार रुपये आहे. त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विविध पदार्थांचा खजिना तत्पर केला आहे, तसेच समितीमधील सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दिमतीला ५२ गाड्यांचा ताफा दिल्याचे बोलले जात आहे.>दौºयामध्ये सर्व सुखसोयींमध्ये कोणतीच असुविधा होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. पंचायत राज समितीला सुविधा पुरवताना अंगणवाडी सेविकांपासून ते थेट अधिकाºयांची चांगलीच ‘पंचायत’ झाल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.