शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:15 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली. अखेरच्या पर्यटन हंगामात फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्यांनी भुरळ पाडली. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाºया लाटा यामुळे श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण ठरत आहेत.मे महिन्यात खास पर्यटनाची चाहूल लागते. या शनिवार, रविवारी महिन्यातील पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी दिवेआगर समुद्रकिनाºयावर दिसून आली. निवडणुकीचे कामकाज आटपून अधिकारी, शाळेची सुट्टी संपत आल्याने आपल्या मित्रमंडळीसह व आपल्या कुटुंबासह थकवा घालवण्यासाठी श्रीवर्धनला आले होते. पुणे, मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनाºयांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत.श्रीवर्धनमधील सुमद्रकिनाºयांवर चांगल्या सुविधा असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ पहावयास मिळते असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.>मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी, पर्यटकांमध्ये नाराजीपेण : मुंबई-गोवा महार्गावरून कोकणातील निसर्ग सोंैदर्याचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी वाहतूककोंडीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्रकिनाºयाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी पेण ते वडखळ मार्गावर होणाºया वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे, कर्नाळा खिंड, खारपाडा, तरणखोप, जिते, उचेडे, रामवाडी, वाशीनाका, पेण रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून काही ठिकाणी पुलाचे तर काही ठिकाणी मोरीचे काम सुरू आहे. ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे कोकणात जाणाºया गाड्यांची तरणखोप बायपास, रामवाडी पूल, वडखळ नाका येथे दररोज वाहतूककोंडी होत असते. शनिवार व रविवारी सुट्टी असल्यामुळे या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे लहान मुलांसह कटुंबीय पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघाले असता भरउन्हात वाहतूककोंडीत अडकले. वडखळ ते पेण मार्ग, माणगाव, लोणेरे, महाड येथे दर शनिवार-रविवारी हे चित्र पाहावयास मिळते. वडखळ ते पेण हे ६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असतो.>रोजगार वाढलापर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे, त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. समुद्रकिनाºयावर पर्यटकांची ही रेलचेल पावसाळ्यापर्यंत अशीच कायम राहणार आहे.