शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 05:02 IST

अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे. याबाबतीत आपण शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात इ. ८ वीपासून पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी राहत आहेत. वसतिगृहात २०१४ पासून महिला गृहपाल एम. जे. नरहरे कार्यरत आहेत. गृहपाल वसतिगृहात मनमानी करतात. त्यामुळे आम्हाला अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या त्रासाला कंटाळून वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आपणास निवेदन देत असल्याचे यात नमूद केले आहे.वसतिगृहातील सुमारे ४० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरिता पोहोचले असता जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मुलांचे म्हणणे आणि तक्रारी जाणून घेतल्या आणि शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मुलांना दिला.२०१५ मध्ये योगेश काष्टे हा विद्यार्थी वसतिगृहात राहत असताना मोबाइलवर काम करीत होता. यावेळी नरहरे यांनी रूममध्ये येऊन त्याला मारहाण केली. त्याने रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस केस करण्याची धमकी देऊन, नरहरेंनी त्याला वसतिगृहातून काढले. १ आॅगस्ट २०१८ रोजी करण काष्टे या विद्यार्थ्यास नरहरे यांनी रूममध्ये झाडू मारण्यास सांगितला. विद्यार्थ्याने झाडू कुठे आहे, याबाबत विचारणा केली असता त्यालाही दमदाटी करीत वसतिगृहातून बाहेर काढले.विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास शिवीगाळ२९ आॅगस्ट २०१८ रोजी काही विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता अर्ज देऊन घरी गेले. मात्र, दुसºया दिवशी नरहरे यांनी त्यांना आॅफिसमध्ये बोलावून दमदाटी करून वसतिगृह सोडून जाण्यास सांगितले. विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक झाल्यास त्यांच्यावर अपशब्दांचा भडिमार होतो. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा, पालकांचाही उद्धार करून सतत अपमानित केले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.पुरुष गृहपाल द्यावे, अन्यथा उपोषण करणारसतत शारीरिक, मानसिक छळ, दमदाटी, शिवीगाळ, पालकांचा अपमान, मारहाणीचे प्रकार घडत असल्याने वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी त्रासले आहेत. या गोष्टींची लेखी तक्रार वेळोवेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. हे वसतिगृह मुलांचे असल्याने याठिकाणी पुरुष गृहपाल नेमण्यात यावा, नरहरे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा वसतिगृहातील सर्व ६० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा दिवसांनंतर आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर ४० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या