शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

खारघरच्या नगरसेवकांचे सिडको कार्यालयावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:55 IST

अधिकाऱ्यांना विचारला जाब; कामे होत नसल्याची तक्रार

पनवेल : वारंवार निवेदन देऊनदेखील सिडकोमार्फत कोणतीच कामे होत नसल्याने खारघर शहरातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी शहरातील विभागीय सिडको कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासनाशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका घेत सुमारे पाच तास भाजपचे शिष्टमंडळ सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे यांच्या दालनात बसले होते.खारघर शहरातील तीन प्रभागांतून भाजपचे सर्वच्या सर्व १२ नगरसेवक निवडून आले आहेत. अशावेळी शहरातील रहिवासी जाब विचारत आहेत. मात्र अद्यापही शहरातील अंतर्गत रस्ते, नाले, गटार, कोपरा पूल आदींसह विविध कामे सिडकोमार्फत योग्य पद्धतीने होत नसल्याने सकाळी १० वाजल्यापासून खारघर शहरातील सिडको कार्यालयातील अधिकारी संजय पुदाळे यांच्या दालनात भाजप शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलन सुरू केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग अ सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे, समीर कदम, दीपक शिंदे,राजेंद्र मांजरेकर, संजय घरत, गुरू म्हात्रे, अजय माळी, महिला नगरसेविका अनिता वासुदेव पाटील, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, अनिता पाटील, बिना गोगरी, निशा सिंग, गीता चौधरी यांच्या दालनात खाली बसून आम्ही दिलेल्या पत्रांची लेखी उत्तरे मिळत नसून शहरातील प्रलंबित कामे कधी पूर्ण होतील, याबाबत या वेळी सिडको अधिकाऱ्यांना विचारणा केली.रखडलेल्या कोपरा पुलाबाबत सिडकोचे उदासीन धोरण आहे. नवी मुंबई पालिकेची जलवाहिनी पुलाला अडथळा ठरत आहे. ती हलविण्यासाठी सिडको नवी मुंबई महापालिकेला प्रस्तावदेखील पाठवत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. लेखी आश्वासन दिल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका या वेळी घेण्यात आली. सिडकोमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे खारघर पोलीस कर्मचाºयांनीही सिडको कार्यालय गाठत घटनेची माहिती घेतली. आगामी काळात नव्याने उर्वरित कामे पूर्ण केली जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले.अध्यक्षपद रिक्त होताच भाजप नगरसेवक आक्रमकवर्षभरापासून आ. प्रशांत ठाकूर हे सिडकोच्या अध्यक्षपदी विराजमान होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आ. प्रशांत ठाकूर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. ठाकूर यांचे सिडकोचे अध्यक्षपद रिक्त होताच खारघर शहरातील भाजप नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसत आहे.