शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

हेटवणे ग्रीड प्रकल्प रखडला

By admin | Updated: July 7, 2015 23:41 IST

सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करण्याकरिता प्राधिकरणाने इतरांवर अवलंबून न राहता स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने पाच वर्षांपूर्वी पावले उचलली होती.

अरुणकुमार मेहत्रे  कळंबोलीसिडको वसाहतींना पाणीपुरवठा करण्याकरिता प्राधिकरणाने इतरांवर अवलंबून न राहता स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने पाच वर्षांपूर्वी पावले उचलली होती. त्याकरिता हेटवणे-कळंबोली ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र पाच वर्षे झाली तरी प्रकल्प पूर्ण झालेला नाही.रेल्वे, महामार्ग, त्याचबरोबर वन विभागाकडून परवानग्या न मिळाल्याने सिडको वसाहतींना अजूनही पाण्यासाठी एमजेपीवर अवलंबून राहावे लागत आहे. सिडकोने कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, द्रोणागिरी, करंजाडे, तळोजा, उलवे या वसाहती विकसित केल्या आहेत. या वसाहतीची लोकवस्ती सहा लाखांच्या जवळपास पोहचली आहे. पाणी पुरविण्यासाठी सिडकोला एमजेपी, नवी मुंबई महापालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. नवी मुंबई महापालिकेकडून सुरळीत पाणीपुरवठा होत असला तरी एमजेपीच्या जुनाट जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कारणांमुळे नवीन पनवेल आणि कळंबोलीतील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. म्हणून या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपली स्वत:ची यंत्रणा असावी असा प्रस्ताव पुढे आला.त्यानुसार हेटवणे धरणातून या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत ४ हजार ४0 सदनिका आणि २ हजार ६५0 सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९00 सदनिका आणि सुमारे ११५0 सोसायट्या आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सर्व ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याकरिता सिडको दररोज एमजेपीकडून ७0 एमएलडी पाणी विकत घेते. खारघर आणि कामोठे येथे सुमारे पाच हजारांच्या जवळपास ग्राहक असून त्यांना ४0 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. याकरिता नवी मुंबई महापालिकेकडून पाणी घ्यावे लागते. हेटवणे - कळंबोली ग्रीडमुळे कळंबोली व नवीन पनवेल वसाहतीतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर खारघर आणि कामोठे येथील ग्राहकांना मुबलक पाणी मिळणार आहे. मात्र काही ठिकाणी जलवाहिन्या रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभागाच्या हद्दीतून टाकाव्या लागणार आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून परवानगी न मिळाल्याने प्रकल्पाचे काम रखडलेले आहे. परिणामी डिसेंबर २0११ साली पूर्ण होणारा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही.