अलिबाग : परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ८० हजार रुपये शासनाने मदत म्हणून तत्काळ द्यावी, याबाबतचे निवेदन अलिबागमधील वकिलांनी निवासी उप जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना शनिवारी दिले.
जिल्ह्यात तयार झालेले भाताचे पीक काही ठिकाणी कापण्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे तयार लोंबींना कोंब आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाच्या अनेक योजनांपासून येथील शेतकरी आजही वंचित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अलिबागचे थोर नेते नारायण नागू पाटील यांनी कूळ कायदा निर्माण करूनही शेतकरी आजही ७/१२ मालकी हक्कापासून बेदखल असल्याचे या वेळी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भातशेती ही डोंगरखोºयांच्या उतारावर असल्यामुळे १० ते १५ गुंठे क्षेत्रात खाचरांची शेती केली जाते. येथील शेतकºयांच्या वाट्याला १५ ते २० गुंठे इतके क्षेत्र आहे, त्यातही कौटुंबिक भाऊबंदकी आहे. एका मजुराची मजुरी ३५० ते ४०० रुपयांवर जाते, त्यामुळे शेती परवडेनासी झाली आहे.
जिल्ह्यातील मंदिर, मस्जीद, चर्चच्या ट्रस्टीकडे लाखो रुपये पडून असून रायगड जिल्ह्याच्या जेएनपीटी, रिलायन्स, जेएसडब्ल्यू, आरसीएफ, गेल, एचपी गॅस, पॉस्को, प्रीव्ही, दीपक फर्टिलायझर्स, सुदर्शन केमिकल्स सारखे प्रकल्प येथील शेतकºयांनी दिलेल्या जमिनींच्या त्यागावर उभे आहेत. या प्रकल्पामुळे राज्याबरोबरच देशाच्या महसुलात हजारो कोटींचा फायदा होत आहे. त्यामुळे सदरच्या कंपन्या व ट्रस्टींकडून शेतकºयांना मदत करणे गरजेचे आहे. शेतकºयांना प्रतिगुंठा दोन हजार रुपये मदत देणे शासनाला कठीण नाही. शासनाने केलेल्या विकासकामांच्या जाहिरातींचा खर्च बंद करून तो निधी शेतकºयांना देण्यात यावा, अशी मागणी अॅड. राकेश पाटील यांनी केली आहे. शासन मदत करताना हेक्टरीच्या हिशोबाने मदत करते. महाराष्ट्रातील शेतकºयांच्या प्रश्नांपेक्षा रायगड जिल्ह्यातील शेतकºयांचे प्रश्न भिन्न आहेत. ज्या वेळी शासन एकरी ८० हजार रुपये देईल, त्या वेळी इथल्या शेतकºयांच्या पदरात किमान चार ते पाच हजार मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रसंगी अॅड. नम्रता पाटील, अॅड. समीर नाईक, अॅड. अभिजीत बागवे, अॅड. प्रशांत म्हात्रे, अॅड. नीतेश ठाकूर, अॅड. गणेश भगत, अॅड. नभेश ठाकूर, अॅड. ॠग्वेद ठाकूर, अॅड. पंकज पाटील हे उपस्थित होते.
अलिबागमधील वकिलांचे निवेदन। रायगडमधील शेतकºयांचे प्रश्न वेगळेजिल्ह्यातील शेतकरी हा १० ते १५ गुंठे आकाराच्या क्षेत्राच्या खाचरांची शेती करतो. महाराष्ट्रातल्या शेतकºयांच्या प्रश्नांपेक्षा येथील शेतकºयांचे प्रश्न भिन्न आहेत. त्यामुळे येथील शेतकºयांना मदत देताना हेक्टरीमध्ये न देता ती एकरीमध्ये देण्यात यावी.- अॅड. राकेश पाटील,वंचित बहुजन आघाडी