शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘हागणदारीमुक्त’ आलेख घसरला

By admin | Updated: October 5, 2015 23:58 IST

हागणदारीमुक्तीच्या गमजा मारणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचा आलेख खाली सरकला आहे. ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती जून महिन्यात हागणदारीमुक्त झाल्या होत्या.

- आविष्कार देसाई,  अलिबागहागणदारीमुक्तीच्या गमजा मारणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचा आलेख खाली सरकला आहे. ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती जून महिन्यात हागणदारीमुक्त झाल्या होत्या. आज आॅक्टोबर अखेर तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ ६२ ग्रामपंचायतींनी तो पल्ला गाठला आहे. २०१९ पर्यंत हागणदारीमुक्तीचे बिरुद मिरविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना झोकून देऊन काम करावे लागणार असल्याचे चित्र आहे.२०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायती या हागणदारीमुक्त करण्याचा रायगड जिल्हा परिषदेचा संकल्प आहे. सरकारने दिलेले लक्ष पेलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र ग्रामपंचायतींकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नसल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीमधील तलाठी, ग्रामसेवक यांनी याकामी स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. मार्च २०१६ पर्यंत २९८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष असून येत्या पाच महिन्यात हे उद्दिष्ट गाठण्याचा खडतर प्रवास ग्रामपंचायतींना करावा लागणार आहे. जून महिन्यात ४७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या होत्या. त्यानंतर पुढील तीन महिन्यात ५ आॅक्टोबरपर्यंत तो आकडा फक्त १५ ने वाढून ६२ वर पोचला. महाड तालुक्यातील १३४ पैकी १६ ग्रामपंचायती या हागणदारी मुक्त करीत महाडने टॉप फाईव्हच्या यादीच प्रथम स्थान पटाकावले आहे.हागणदारीमुक्त करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्याबरोबरीनेच लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. तो प्राप्त व्हावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. दिलेल्या उद्दिष्टाची पूर्ती करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.-पुंडलिक साळुंंखे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तालुकाग्रामपंचायतीहागणदारीमुक्तमहाड १३४ १६ म्हसळा ४० १५ श्रीवर्धन ४३ १० उरण ३४ ०५पनवेल ५१ ०५ कर्जत ५० ०२पोलादपूर ४३ ०२रोहे ६४ ०२अलिबाग ६२ ०१खालापूर ४२ ०१माणगाव ७४ ०१पेण ६३ ०१तळा २६ ०१मुरुड २४ ००सुधागड ३४ ००पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील आहेत. उरण, पनवेल, पेण, अलिबाग, कर्जत, रोहे तालुक्यांना अर्बन टच आहे. त्या ग्रामपंचायतींचे काम मात्र तुलनेने कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होेते.