शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळावासीयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:06 IST

गेल्या १० ते १२ वर्षांपासून दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून धोकादायकरीत्या सुरू आहे.

- अरुण जंगम म्हसळा : गेल्या १० ते १२ वर्षांपासून दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून धोकादायकरीत्या सुरू आहे. याचाच प्रत्यय मंगळवार, १७ सप्टेंबरला म्हसळा शहरवासीयांना आला. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास एक लोखंडी कॉइल वाहतूक करणारा ट्रेलर (एम. एच. ४६ बी. एफ. ५३१९ ) वेगात नवानगर येथील एका इमारतीच्या दुकानात घुसला. अपघाताची वेळ ही पहाटेची असल्याने दुकाने बंद होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.दिघी पोर्ट येथून पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, विळे-भागाड, माणगाव येथे गेले अनेक वर्षे नियमित लोखंडी कॉइल घेऊन जाणाऱ्या जवळपास २०० ते २५० ट्रेलरची वाहतूक रोज सुरू आहे. त्यातीलच एक ट्रेलर मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने वेगाने नवानगर येथील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या आतिक खतीब यांच्या इमारतीतील शिवसेना तालुकाप्रमुख महादेव पाटील व सिराज मुसा यांच्या गाळ्यासमोरील गटार व पत्रा शेड तोडून धडकल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघाताची वेळ ही पहाटेची असल्याने दुकानमालकांसहित कोणतीही व्यक्ती अपघातसमयी हजर नव्हती. अपघात घडताच ट्रेलरचालकाने मात्र त्वरित घटना स्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच म्हसळा नवानगर येथील नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन या अवजड वाहतुकीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिघी रस्ता ते श्रीवर्धन रस्त्यापर्यंत लागल्या होत्या. त्यामुळे पहाटे म्हसळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. काही वेळातच पोलीसही घटनास्थळी हजर झाले व शेवटी म्हसळा पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. या अपघातासंदर्भात संबंधित ट्रेलरचालकावर म्हसळा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. याआधी म्हसळा तालुक्यातील खरसई गावाच्या हद्दीतील एका घरात असाच लोखंडी कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर घुसून घराचे नुकसान झाले होते, त्या वेळीही सुदैवाने घरातील व्यक्ती बचावल्या.>पहाटे ४.४५ च्या सुमारास मला एखादा स्फोट व्हावा, असा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. मी राहत असलेल्या घराच्या बाजूच्या इमारतीला लोखंडी कॉइल घेऊन जाणाºया ट्रेलरने धडक दिली असल्याच निदर्शनास आले. हा आवाज इतका मोठा होता की नवानगर येथील अनेक नागरिक त्वरित घटनास्थळी काय घडले हे पाहण्यासाठी जमा झाले. या घटनेमुळे माझे कुटुंब तसेच परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. ट्रेलर जर थोडा पुढे आला असता तर थेट माझ्या घरातच घुसला असता आणि मोठा अनर्थ झाला असता.- नवीद जंजीरकर, नवानगर, प्रत्यक्षदर्शीम्हसळा शहरातून ही अवजड वाहतूक बंद व्हावी, यासाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा विनंती केली आहे. याआधी दिघी पोर्टमधून २५-२८ टन वजनाची लोखंडी कॉइल तसेच कोळसा येत असे; परंतु गेल्या काही महिन्यांत इथॅॅनॉल सारख्या प्रचंड ज्वलनशील द्रवपदार्थाचीही वाहतूक होत आहे. म्हसळा नगरपंचायतीकडे अद्याप अग्निशमक यंत्रणा उपलब्ध नाही, तसेच दिघी पोर्टनेही शहराजवळ कोणत्याही प्रकारची अग्निशमक यंत्रणेची व्यवस्था केलेली नाही मग या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक दिघी पोर्ट कोणत्या नियमाने करीत आहे ते दिघी पोर्ट प्रशासनाने सांगावे. ही दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून त्वरित बंद करावी अन्यथा आम्ही शहरवासीय स्वत: दिघी पोर्टचा एकही ट्रेलर किंवा टँकर म्हसळा शहरातून जाऊ देणार नाही.- मुसद्दिक इनामदार, सामाजिक कार्यकर्ते