शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:07 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स या कारखान्याला आज भीषण आग लागली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कारखान्यातील यंत्रसामुग्री आणि मालमत्ता मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली.

- संदीप जाधव रायगड: महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स या कारखान्याला आज भीषण आग लागली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कारखान्यातील यंत्रसामुग्री आणि मालमत्ता मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली. आगीचे निश्चित कारण समजलेले नाही. गेल्या महिनाभराच्या काळात महाड औद्योगिक वसाहतीमध्ये घडलेली आगीची ही दुसरी मोठी घटना आहे.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत पाणी आणि फोमचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे तीन चार तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. महाड नगरपालिकेचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत कारखान्यातील यंत्रसामुग्री आणि मालमत्ता मोठ्या प्रमाणावर स्वाहा झाली होती. आग या कारखान्याबाहेर पसरू नये म्हणून महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एल अँड टी या कंपनीने कारखान्याबाहेर मातीचे डंपर ओतून आवश्यक ती दक्षता घेतली.आगीमध्ये या कारखान्यातील रसायनाने देखील पेट घेतल्याने त्या वायूमुळे अग्निशमन कर्मचारी त्याचप्रमाणे घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि नागरिकांना डोळे चुरचुरणे, डोळ्यांतून पाणी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागले. या कारखान्यालगतच जीते हे गाव आहे. या गावांतील नागरिकांमध्येही भीती आणि दहशतीचे वातावरण पहावयास मिळाले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स. पो. निरीक्षक आबासाहेब पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. आग निश्चित कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र शेजारच्या कारखान्यातून उडालेल्या ठिणगीने ही आग लागल्याचा दावा केला जात होता. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.

टॅग्स :Raigadरायगड