शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

हेटवणे कालव्याला पाणी सोडले

By admin | Updated: December 31, 2016 04:20 IST

तालुक्याला वरदान ठरलेले हेटवणे मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगामासाठी कालव्यात २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन

पेण : तालुक्याला वरदान ठरलेले हेटवणे मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगामासाठी कालव्यात २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मितीसाठी असलेले सात दशलक्ष घनमीटर राखीव पाण्यातून सध्या १८०० हेक्टर क्षेत्रावरच सिंचन क्षमता उपलब्ध आहे. हेटवणे उजवा व डावा कालवा अशा १९ किमीच्या टप्प्यात कालव्याला पाणी सोडल्याने येत्या नववर्षाच्या प्रारंभीच रब्बी हंगामाच्या अनुषंगाने शिवारात शेतकरी व मजुरांची रेलचेल वाढणार आहे.२०१६ या सरत्या वर्षाला निरोप देताना, नव्या वर्षाच्या २०१७ च्या पुढील चार महिन्यांच्या रब्बी हंगामाची तयारी यापूर्वीच शेतकरी बांधवांनी केली आहे. नोटाबंदीने ग्रामीण जीवनात उडालेली खळबळ व कॅशलेस व्यवहाराचा सुरू झालेला बोलबाला याकडे दुर्लक्ष करीत बळीराजा आता रब्बीच्या मोसमाची तयारीत गुंतला आहे. सध्या पाच दिवस सोडण्यात आलेल्या सिंचनाच्या पाण्याने शेतजमीन पूर्णपणे भिजलेली नाही. १८ हेक्टर क्षेत्र पूर्णपणे ओलेचिंब होण्यासाठी नववर्षाचा पहिला आठवडा जाणार आहे. हेटवणे कालव्याची देखाभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागली आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांसाठी पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. सध्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने कालव्यातील कचरा पाण्याच्या पृष्ठभागावरून वाहतो आहे. हवेत गारठा व पारा खाली असल्याने हेटवण्याच्या प्रवाहाने तो अधिकच खाली गेला आहे. नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात २० ते २२ जानेवारी २०१७ पासून रब्बीच्या भातशेती लावणी हंगामास प्रारंभ होणार आहे. सध्या भिजलेल्या भाताच्या वाफ्यामध्ये बीजरोपण तथा पेरणी प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी पेण तालुक्यात ४ हजार ३०० मिमी एकूण पावसाची झालेली नोंद झाल्याने रब्बी हंगामात कालव्याला मुबलक पाणी सोडण्यात हेटवणे प्रकल्प संस्थेला अडचण भासणार नाही. एकूण रब्बी हंगामास अनुकूल वातावरण निर्मिती व शंभर टक्के उत्पादनाची ठोस हमी असल्यामुळे रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. (वार्ताहर)