शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्ट्यांच्या धुरामुळे आरोग्याला धोका

By admin | Updated: March 5, 2017 02:59 IST

वीट ही बांधकाम व्यवसायातील अविभाज्य भाग आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक सरकारी व खासगी प्रकल्प विकसित होत आहेत. बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक

दासगाव : वीट ही बांधकाम व्यवसायातील अविभाज्य भाग आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक सरकारी व खासगी प्रकल्प विकसित होत आहेत. बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक विटेची मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या लावल्या जातात. महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसवून तयार करण्यात आलेल्या या वीटभट्ट्या येथील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहेत. महसूल विभागाने घालून दिलेल्या नियमावलीची राजरोसपणे पायमल्ली होत असताना महसूल विभागाकडूनच याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.बांधकाम व्यवसायामध्ये खूप झपाट्याने प्रगती होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान बांधकामासाठी वापरले जात आहे. त्याचप्रमाणे बांधकामातील महत्त्वाचा घटक असलेली वीटदेखील वेगळ्या आकारात नवीन तंत्रात उपलब्ध होत आहेत. औद्योगिक वसाहतीतून निघणारे फल्यहॅश, जिप्सम तसेच सिमेंट क ाँक्रीटच्या विटा बाजारात उपलब्ध आहेत. तरीदेखील पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या विटेला मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि व्यावसायिकांची पसंती आहे. शेतातील माती, भाताचा कोंडा खळ्यामध्ये कुजवून या विटेची बांधणी केली जाते. पुढे भट्टीमध्ये तापवून मातीची ही वीट पक्की केली जाते. या भट्टीसाठी जळाऊ लाकूड, दगडी कोळसा, भाताचा कोंडा आदींचा वापर केला जातो. विटांची ही भट्टी १० ते १५ दिवस जळती ठेवली जाते.वीट पक्की करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या या भट्टीमध्ये दगडी कोळसा, जळाऊ लाकूड आणि कोंडा यांचा वापर केला जातो. हे तिन्ही घटक जळत असताना मोठ्या प्रमाणात धूर निर्माण करतात. यावेळी निर्माण होणारी राख धुरासोबत परिसरात पसरत असते. यामुळे वीटभट्टीच्या शेजारच्या परिसरात आरोग्यास घातक असे वातावरण तयार होते. ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करता शासनाने वीटभट्ट्यासाठी कडक नियमावली बनवल्या आहेत. त्यामध्ये वीटभट्टीचे रस्त्यापासून अंतर, रहिवासी वस्तीपासूनचे अंतर याचा विशेष उल्लेख आहे. वीटभट्टीला परवानगी देताना वीटभट्टी मालकाला या नियमावलीची समज महसूल विभागामार्फत दिली जाते. नियम चुकवल्यास दाखल होणारा गुन्हा आणि दंड याची देखील माहिती दिली जाते. मात्र, केवळ व्यावसायिक विचार करणारे हे वीट व्यावसायिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार न करता मुख्य रस्ता आणि रहिवासी भागातच वीटभट्ट्या उभारत आहेत. यामुळे रहिवासी भागात वीटभट्ट्याच्या धुराचा त्रास होतोच, तर वीटभट्टी तयार झाल्यानंतर अगर वीटभट्टी खुली करताना यातील राख वाऱ्यासोबत उडून ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)वीटभट्टीसाठीचे नियमही धाब्यावरमहाड तालुक्यात शेकडो शेकडो वीटभट्ट्या सुरू असून, धुराने संपूर्ण महाड तालुका ग्रासला आहे. सकाळच्या वेळी या धूर आणि धुक्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रात होतो. मात्र, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या भट्ट्यांवर महसूल विभागामार्फत कारवाई करताना नरमाईचे धोरण स्वीकारले जात असल्याने या व्यावसायिकांचे फावले आहे.वीटभट्टीच्या होणाऱ्या धुरामुळे खोकला, दमा, डोळ्यात जळजळ होणे, दृष्टी कमी होणे असे अनेक आजार मनुष्याला उद्भवू शकतात. - डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, महाड