शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घातक पदार्थांमुळे मिळते दुर्घटनेला निमंत्रण, नागरिक, कामगारांचे जीवन धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 06:27 IST

उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमधील पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअर हाऊसिंग आणि बफरयार्डमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येत असलेल्या घातक पदार्थांच्या साठवणुकीमुळे आगीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमधील पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअर हाऊसिंग आणि बफरयार्डमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येत असलेल्या घातक पदार्थांच्या साठवणुकीमुळे आगीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील गावातील वस्ती, नागरिक आणि कामगारांचे जीवन धोक्यात येऊ लागले आहे. हजारो नागरिक, कामगारांच्या जिवाशी खेळ करू पाहणाऱ्या संबंधित प्रकल्पांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी पागोटे ग्रामपंचायतीने कस्टम आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.उरण परिसरात द्रोणागिरी नोडमध्ये पंजाब सरकारच्या मालकीचे पंजाब स्टेट कंटेनर ॲण्ड वेअरहाऊसिंग आणि बफरयार्ड हे दोन कंटेनर यार्ड कार्यरत आहेत. या दोन्ही कंटेनर यार्डमध्ये दिलेल्या परवानगी पेक्षाही मोठ्या प्रमाणावर घातक पदार्थ साठवणूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेले पत्रा शेड, एक्सपोर्ट गल्लीतील पत्रा शेड, तारपोलिन शेड, आदी विविध ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात घातक पदार्थांची साठवणूक केली जात आहे.विशेष म्हणजे आगीची दुर्घटना घडली तर या दोन्ही कंटेनर यार्डमध्ये आग विझविण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नाही. याआधीही पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअरहाऊसिंग प्रकल्पात २०१० साली आगीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून नष्ट झाली होती. याकडे लक्ष वेधून घातक पदार्थ साठवणुकीचा परवाना रद्द करण्याची मागणी पागोटे ग्रामपंचायतीने कस्टम, आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.घातक पदार्थांच्या साठवणुकीविरोधात करण्यात आलेली तक्रार चुकीची आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या काही सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या तक्रारी करण्यात आल्या.- जेम्स जोसेफ, प्रकल्प युनिट हेड

टॅग्स :Raigadरायगड