शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हरिभक्ती हे भगवंतापर्यंत जाण्याचे साधन: हभप अनिल महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 16:13 IST

अनिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सात दिवस अखंड हरिनाम साजरा करण्यात आला.

मधुकर ठाकूर, उरण : 'हरिभक्ती हे भगवंतापर्यंत जाण्याचे साधन असून प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण केल्याशिवाय फळप्राप्ती होत नाही. सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावे लागते तसेच भगवंताची भक्ती होत असताना अनेक अडथळे येत असतात. मात्र भगवंताच्या नामस्मरणाने फळप्राप्ती होते,' असा उपदेश  हभप अनिल महाराज यांनी कीर्तनातून  केला. 

चिरनेर कातळपाडा येथील दत्त जयंती उत्सव सोहळा निमित्ताने सद्गुरु माऊली हसुरामबाबा आणि  तसेच गुरुकुलच्या सहकार्याने हभप गजानन महाराज, हभप चिदानंद महाराज, हभप मदन महाराज व दात्यांच्या सहकार्याने व्यासपीठ चालक गुरुवर्य हभप अनिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सात दिवस अखंड हरिनाम साजरा करण्यात आला. या सप्ताहात  विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दरवर्षीप्रमाणे सप्ताहाच्या सातव्या दिवशी दीपोत्सवाच्या माध्यमातून सप्ताहाची सांगता करण्यात आली.  या अखंड हरिनाम सप्ताहात भजन, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले होते. मंगळवारी सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी नामदेव भगत, चंद्रकांत गोंधळी, हभप अनिल महाराज, हभप दत्तात्रेय महाराज, हभप विश्वास महाराज, हभप हसुराम म्हात्रे, हभप रमेश महाराज, हभप  वसंत महाराज, हभप कृष्णा म्हात्रे, हभप मारुती महाराज, हभप हरिश्चंद्र गोंधळी, हभप समीर गोंधळी, तसेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व वारकऱ्यांनी तसेच थोर कीर्तनकारांनी दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला.

टॅग्स :uran-acउरणRaigadरायगड