शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये रुग्णांना त्रास; रेमडेसिविरचा वापर थांबवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 00:35 IST

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची माहिती

ठळक मुद्देराज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील तीन विविध रुग्णालयांमधील ९० कोरोनाबाधितांवर हेटेरो ड्रग्ज या कंपनीतर्फे उत्पादित करण्यात आलेल्या रेमडेसिविर औषधांनी उपचार करण्यात येत होते

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोरोनाबाधितांवरील उपचारांत प्राधान्यक्रमावर असलेल्या रेमडेसिविरच्या वापरामुळे ९० रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आल्याने या विशिष्ट ब्रँडच्या औषधाचा वापर थांबविण्यात आल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे. 

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील तीन विविध रुग्णालयांमधील ९० कोरोनाबाधितांवर हेटेरो ड्रग्ज या कंपनीतर्फे उत्पादित करण्यात आलेल्या रेमडेसिविर औषधांनी उपचार करण्यात येत होते. मात्र, औषधाच्या मात्रा शरीरात जाताच रुग्णांमध्ये थंडी वाजणे, रक्तदाब अचानक कमी होणे, तापात चढ-उतार होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे इत्यादी प्रकारचे दुष्परिणाम आढळून आले. अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी यासंदर्भात संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी  चौधरी यांनी अधिक तपास केला असता संबंधित औषधे हेटेरो ड्रग्ज या कंपनीत उत्पादित झाल्याचे स्पष्ट झाले. शिंगणे यांनी तातडीने यावर कारवाई करत संबंधित कंपनीकडून उत्पादित होणाऱ्या रेमडेसिविर औषधाच्या वापरावर स्थगिती आणली. कंपनीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे शिंगणे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरRaigadरायगड