शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत पाचशे अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:30 IST

झोपडपट्टीतील कारवाईमुळे नागरिक-प्रशासनात वाद

महाड : महाड नगरपालिकेने गेल्या तीन दिवसांपासून राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेची गुरुवारी सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत शहरातील ५०० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात नगरपालिका प्रशासन यशस्वी झाले आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या शिवाजी चौक झोपडपट्टीतील अतिक्रमणेही हटवण्यात आली आहेत.मोहिमेला मंगळवारपासून महाड नगरपालिका प्रशासनाने प्रारंभ केला. महाड बाजारपेठ (म. गांधी मार्ग), छ. शिवाजी मार्ग, दस्तुरी नाका परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिसर, क्रांती स्तंभ (भीमनगर) परिसर, खारकांड मोहल्ला आणि शिवाजी चौक झोपडपट्टी या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी अखेरच्या दिवशी खारकांड मोहल्ला भागात, काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. त्यातून नगरपालिका प्रशासन आणि या नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत या भागातील कारवाईही पूर्ण केली.मुख्य रस्त्यावरील बांधकामे पाडलीशहरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारांवर करण्यात आलेली पायऱ्यांची आणि अन्य बांधकामे, गटारांच्या वर आलेले दुकानांचे नामफलक या कारवाईमध्ये काढून टाकले.अनेक व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेत स्वत:च अतिक्र मणे काढून टाकल्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात कटुता, वाद निर्माण होण्याचे प्रसंग फारसे घडले नाहीत.शिवाजी चौक झोपडपट्टीत कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, नगरपालिका प्रशासनाने कोणतीही भिडभाड न ठेवता या झोपडपट्टीतील अतिक्र मणे हटविली, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणRaigadरायगड