शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमध्ये पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:32 IST

बोर्लीपंचतन शहराला जोडणारे मार्ग पाण्याखाली

दिघी : श्रीवर्धन तालुक्यात वादळी पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार सुरुवात केल्याने बोर्लीपंचतन शहराला जोडणारे मार्ग पाण्याखाली गेले. याशिवाय रस्त्यालगत अनेक वृक्ष उन्मळून पडले. परिणामी लहान-मोठे रस्ते बंद झाल्याने परिसरातील चाळीस गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यातील बोर्लीपंचतन परीसरात शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वाऱ्याने पावसाची सुरुवात झाली. शनिवारी बोर्लीपंचतन शहराला जोडणारे अनेक मार्ग पाण्याखाली गेले. तर दिवेआगर गावामध्ये सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. यातील तालुक्याला जोडणारा श्रीवर्धन - बोर्लीपंचतन जिल्हा मार्गावर कार्ले गावाजवळ १ किलोमीटर अंतरावर नदीने पूररेषा ओलांडली. बोर्लीपंचतन येथून मुंबईकडे जाणाºया मुख्य मार्गावर वाकडे पुलानजीक नदीने धोक्याची पातळी ओलांडल. पूरसदृश्य परिस्थितीमुळे मुंबई, पुणे आणि माणगाव, महाड शहराकडे जाणाºया महामंडळच्या गाड्यांना बोर्लीपंचतन बसस्टॉपवर थांबावे लागले.काही तास वाहतूक बंददिवेआगर, खुजारे, शिस्ते गावच्या रस्त्यालगत वृक्षांना वादळी वाºयाचा तडाखा बसल्याने वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी कोसळले. वाहतूक काही काळ खोळंबली होती. ग्रामस्थ व वाहन चालकांच्या मदतीने झाड रस्त्यातून हटवण्यात आले.शेतीचे नुकसानसंपूर्ण श्रीवर्धन तालुक्याला समुद्रकिनाऱ्यांनी वेढले आहे. भरती व अतिवृष्टीमुळे खाडीलगत गावामध्ये उधाणाचे पाणी शिरून शिस्ते, मेंदडी, वारळ या गावांतील शेतकºयांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसापूर्वी केलेली भात लावणी पावसात वाहून गेली आहे.पाच दिवस वीजपुरवठा खंडितजिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती. श्रीवर्धन तालुक्यात आठवड्यात पडलेल्या वादळी पावसामुळे सातत्याने पाच दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस