शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अंबा नदीतील रेती उत्खननाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 03:01 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेण तालुक्यातील गावांलगतच्या अंबा नदीत प्रचंड प्रमाणात रेती उत्खनन केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

राजेश भिसे नागोठणे : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेण तालुक्यातील गावांलगतच्या अंबा नदीत प्रचंड प्रमाणात रेती उत्खनन केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गावांतील पश्चिम बाजूकडील शेती या अनधिकृत वाळू उपशामुळे जवळपास उद्ध्वस्त झाली असताना पूर्व बाजूकडील गावांमधील शेती सुद्धा या उपशामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने पेण तहसील कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नागोठणे विभागात पेण तालुक्यातर्गत असणाºया अंबा नदीच्या किनाºयालगत नदीच्या पश्चिम बाजूला तरशेत, जांभूळटेप, शिहू, आटिवली, तर पूर्व बाजूला कोलेटी, कोलेटीवाडी, तळेखार आदी गावे आहेत. गेली अनेक वर्षे या ठिकाणाहून रेतीचा प्रचंड उपसा काढला जात असल्याने खाडीलगतच्या खारबंधिस्तीला खांडी पडून खारे पाणी शेतात घुसल्याने पश्चिम बाजूकडील शेती जवळपास नापिकी झाली आहे. पूर्वीपासून हातपाटीद्वारे रेतीचा उपसा व्हायचा, मात्र कमी वेळात जादा रेती उपलब्ध म्हणून नदीत सक्शन पंप लावून रेतीचा उपसा केला जात असल्याचे संबंधित प्रतिनिधीने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आढळून आले आहे. दिवसभरात ५0 ते ७५ ब्रास रेतीचे येथून उत्खनन होत असल्याने वाळू माफियांना या मालाचे दररोज साधारणत: १ लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. नदीतून उपसा केलेली वाळू, ट्रॅक्टर तसेच मोठ्या अवजड वाहनांद्वारे इच्छित स्थळी पोहचवण्याची कामगिरी केली जात असल्याचे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. शेतीचे नुकसान होत असतानाच नदीतून वाळू खेचणारा सक्शन पंप दिवसभर चालूच राहात असल्याने मासळीची विक्र ी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालविणाºया स्थानिक मच्छीमार बांधवांना किनारपट्टीला तसेच डोलींना मच्छीच लागत नसल्याने त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याचे सांगितले गेले. शासनाने वाळू उपशावर निर्बंध घातले असतानाही या ठिकाणी उघडउघड रेती उत्खनन केले जात असल्याने या वाळू माफियांवर नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल केला जात आहे.