शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:35 IST

मुुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च

अलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम ज्या कंत्राटदारांना दिले आहे, त्यांच्यावरच गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी असते, तसे सरकारने कंत्राटदाराबरोबर केलेल्या करारात नमूदही असते. त्याकरिता पालकमंत्री या नात्याने आपणही पाठपुरावा करत असल्याचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

शुक्रवारी केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी यांना गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चार किलोमीटरचे अंतर कापायला अर्धा तास लागला. त्यावर, मंत्री म्हणून मला या रस्त्याची लाज वाटते, अशी उद्विग्न भावना व्यक्त केली. महामार्गाची दुरवस्था आणि त्यास जबाबदार यंत्रणांची निष्क्रीयता पुन्हा चर्चेत आली आहे.

खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केल्याचा दावा

गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आमचे नाही. तरी गेल्या चार-पाच वर्षांत विशेषत: गणेशोत्सवाच्या वेळी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून सांगितल्यावर खड्डे बुजवण्याचे काम केवळ सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून केले आहे.

खड्डे बुजवण्याच्या कामावर गेल्या चार-पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत; परंतु त्या कामाचे स्वतंत्र बिल मिळणार की नाही, या बाबत शासनाकडून स्पष्टता नाही, अशी भूमिका नाव जाहीर न करण्याच्या अटीवर गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली आहे.दोन वर्षांत ३७ समजपत्रेच्गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट ज्या कंत्राटदारास देण्यात आले आहे, त्यानेच सद्यस्थितीतील गोवा महामार्गाची सुरक्षितता अबाधित राखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करणे व धोकाविरहित ठेवणे हे त्यांच्या कंत्राट करारनाम्यातच नमूद आहे. त्याच आधारावर २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांत या कंत्राटदारांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने एकूण ३७ लेखी पत्रान्वये समज दिल्याची माहिती रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबत न्यायालयीन लढाई लढत असलेले सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय उपाध्ये यांनी दिली आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी प्रवास करणार म्हणून कंत्राटदारांनी गुरुवारपासून वडखळ ते पेण दरम्यान खड्डे बुजवले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग