शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आराेग्य उपकरणांचे पालकमंत्र्यांनी केले लाेकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 08:38 IST

जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून माेठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, त्यांना आवश्यक असलेल्या आराेग्य सुविधा पुरेशा मिळत नसल्याची बाब नागाव येथील आठवले परिवाराच्या लक्षात आली हाेती.

आविष्कार देसाईरायगड :अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नव्याने बसविण्यात आलेल्या डिजिटल एक्सरे, सी.आर. सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर, मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण शनिवारी झाले. अलिबाग-नागाव येथील आठवले परिवाराने महादेव गणेश आठवले आणि रजनी महादेव आठवले यांच्या स्मरणार्थ लाखाे रुपयांची आराेग्य साधने दान केली आहेत. मात्र, आजच्या लाेकापर्ण साेहळ्यामध्ये आठवले परिवारातील एकही सदस्य उपस्थित नव्हते. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून माेठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, त्यांना आवश्यक असलेल्या आराेग्य सुविधा पुरेशा मिळत नसल्याची बाब नागाव येथील आठवले परिवाराच्या लक्षात आली हाेती. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना उपयाेग व्हावा यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाला आवश्यक त्या सुविधा देण्यावर आठवले परिवारातील सदस्यांचे एकमत झाले. त्यानुसार त्यांनी डिजिटल एक्सरे, सी.आर. सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर, मॅमोग्राफी मशीन देण्याचे ठरवले. मात्र, त्यांच्या किमती प्रचंड असल्याने आठवले परिवाराने उपकरणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी थेट संपर्क साधला. समाजासाठी आम्ही या मशीन दान करणार असल्याने आपणही किमती कमी कराव्यात, अशी विनंती कंपन्यांना केली हाेती. कंपन्यांनीही ती मान्य केली आणि जिल्ह्यासाठी एक वर्षापूर्वीच संबंधित उपकरणे आली. त्यानंतर काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे त्याचे रीतसर लाेकार्पण करता आले नाही. आठवले परिवाराला काेणत्याच राजकीय पक्षातील व्यक्तींकडून लाेकार्पण करायचे नव्हते.

यासाठी त्यांनी आराेग्य आणि जिल्हा प्रशासनाला अवगत केले हाेते, अशीही चर्चा कार्यक्रमस्थळी हाेत हाेती. शनिवारी सकाळी डिजिटल एक्सरे, सी.आर. सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर, मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, शेकापचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक  यांच्यासह अन्य राजकीय व्यक्ती उपस्थित हाेत्या. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी निधी चाैधरी, जिल्हा पाेलीस अधीक्षक अशाेक दुधे,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, आरसीएफचे अधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते. आठवले परिवानराने येथील आरसीएफ कंपनी, मुंबईतील नाना पालकर समितीलाही भरीव आर्थिक मदत दिली आहे.

समाजाला उपयोग व्हावा, यासाठी केली मदत, आमचा सहभाग संपला- आठवले -

- दरम्यान, आम्ही समाजाला उपयाेग व्हावा यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाला आवश्यक असणारी उपकरणे दिली आहेत. आता आमचा सहभाग संपला आहे. आमचा कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्तीसोबत आकस नाही. त्यामुळे अन्य काेणत्याही वादात आम्हाला जायचे नाही, अशी नाराजी आठवले परिवाराने व्यक्त केली.

- आठवले परिवाराने लाेकार्पण साेहळ्याची निमंत्रण पत्रिकाही छापली हाेती. त्यामध्ये जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. तसेच निमंत्रक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने यांचे नाव आहे, तर साैजन्य म्हणून आठवले परिवार आणि आरसीएफ लि. थळ असे लिहिले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलalibaugअलिबागRaigadरायगडguardian ministerपालक मंत्री