शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये पालकमंत्री, आमदारांनी केले चाचणी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 02:35 IST

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आपण दिलेले मतदान नेमके कुणाला गेले याबाबत शंकेला वाव असू नये यासाठी व्हीव्हीपॅट यंत्र संलग्न करण्यात आले आहे.

अलिबाग : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र यावरील मतदानासंदर्भात जनजागृती अभियान सुरू आहे. या अभियानात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थिर मतदान व व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती पथकाने स्थापन केलेल्या चाचणी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच उपस्थित सर्व आमदार व लोकप्रतिनिधींनी चाचणी मतदान करून पाहिले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आपण दिलेले मतदान नेमके कुणाला गेले याबाबत शंकेला वाव असू नये यासाठी व्हीव्हीपॅट यंत्र संलग्न करण्यात आले आहे. आपण मतदान यंत्रावर ज्या चिन्हाचे बटन दाबले त्याच चिन्हाचे अंकन केलेली कागदी स्लिप येते ती सात सेकंद मतदारासमोर राहते व नंतर यंत्रात जमा होते. याद्वारे आपण जे बटन दाबले त्याच चिन्हाला मतदान झाले याची खात्री मतदाराला होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य आमदार व लोकप्रतिनिधींनी स्वत: चाचणी यंत्रावर मतदान केले व व्हीव्हीपॅट यंत्रावर त्याच चिन्हाची चिठ्ठी येत असल्याची खात्री केली.या चाचणीत जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, आ. बाळाराम पाटील, आ. भरत गोगावले, आ. मनोहर भोईर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड.आस्वाद पाटील आदींनी स्वत: चाचणी मतदान केले व खात्री करून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड