शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

‘त्या’ निराधार बालकांना गवसली दिशा

By admin | Updated: October 29, 2016 04:02 IST

दहा वर्षांची प्रेरणा, आठ वर्षांची प्राजक्ता आणि अवघ्या पाच वर्षांचा दत्ता या तिघा भावंडांचे मातृछत्र अकाली हरपले आणि स्वच्छंदी बागडण्याच्या ऐन कोवळ््या वयातच त्यांच्या

- जयंत धुळप,  अलिबागदहा वर्षांची प्रेरणा, आठ वर्षांची प्राजक्ता आणि अवघ्या पाच वर्षांचा दत्ता या तिघा भावंडांचे मातृछत्र अकाली हरपले आणि स्वच्छंदी बागडण्याच्या ऐन कोवळ््या वयातच त्यांच्या वाट्यास जगण्याची भ्रांत आली. परंतु ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार त्यांच्या आयुष्यास खऱ्या अर्थाने दिशा देण्यासाठी अगदी देवासारखी उभी राहिली ती कर्जतमधील दिशा केंद्र संस्थेच्या माध्यमातून कार्यरत ‘चाईल्डलाइन’ ही निराधार बालकांना आधार मिळवून देणारी केंद्र सरकारची योजना.१० वर्षांची प्रेरणा सुनील सिंग, आठ वर्षांची प्राजक्ता सुनील सिंग आणि अवघ्या पाच वर्षांचा दत्ता सुनील सिंग ही तिन्ही भावंडे कर्जतमधील गुंडगे येथील रोहिदास नगरमध्ये राहात होती. त्यांचे वडील सुनील सिंग यांनी काही वर्षांपूर्वी पत्नी अनिताला घटस्फोट दिला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुनील सिंग हे अनिताकडे परत आले. काही दिवसांनी अनिता आजारी पडली. फेब्रुवारी २०१६ मध्ये किडनीच्या आजाराने अनिताचा मृत्यू झाला. यानंतर सुनील सिंग दारू पिऊन मुलांना मारहाण करीत असत. यामुळे ही तीनही भावंडे त्यांचे आजोबा वसंत मसुगडे यांच्याकडे राहायला लागली. मुलांचे वडील सुनील सिंग कर्जतमध्येच एका हॉटेलात काम करतात. आजोबा वयस्कर आहेत आणि ते कर्जत रेल्वे कॅन्टींगमध्ये काम करून या मुलांचा सांभाळ करत होते. दत्ता लहान असल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये सोबत घेऊ न जायचे, मात्र अल्पवयीन प्रेरणा आणि प्राजक्ता या दिवसभर गावात फिरत असायच्या, परिणामी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.आजोबा वसंत मसुगडे यांनी चाईल्डलाइनकडे मुलांना संगोपनासाठी मदत मागितली. दिशा केंद्र रायगड चाईल्डलाइनने या मुलांना बाल कल्याण समितीच्या सहकार्याने, अलिबागजवळच्या सोगाव येथील निराधार मुलांकरिताच्या एसओएस बालग्राममध्ये दाखल केले. आता या मुलांची एसओएस बालग्राममध्ये निवारा, पौष्टिक आहार तसेच शिक्षणाची देखील सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आणि त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद निर्माण झाला असल्याची माहिती दिशा केंद्राचे समन्वयक अशोक जंगले यांनी दिली आहे.