शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने निधी दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 01:22 IST

Gram Panchayat News : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील

 पनवेल : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील, अशी आशा पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे व्यक्त केली.पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भास्करराव पेरे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत होते. भास्करराव पेरे पाटील हे सलग २५ वर्षे औरंगाबाद येथील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. पाटोदा ग्रामपंचायतीला दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने पाटोदा ग्रामपंचायतीला आदर्श गाव पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवकर ग्रामपंचायतही रायगड जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या ३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सरपंच अनिल ढवळे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमात पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, सरपंच अनिल ढवळे, काशिनाथ पाटील, उपसरपंच लक्ष्मण तुपे, महेंद्र पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, सरपंचाने ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छ पाणी, स्वच्छता, मुलांचे शिक्षण, सांडपाण्याचा योग्य निचरा आदी प्रश्न प्रकर्षाने सोडविण्याची गरज आहे.संकट ओढावलेकोरोना काळात राज्य शासनावर आर्थिक संकट ओढावले. यावेळी शासनाने ग्रामपंचायतीच्या खात्यातून पैसे काढल्याचा गौप्यस्फोट भास्करराव पेरे पाटील यांनी या कार्यक्रमात केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड