शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

 ग्रा.पं.च्या निवडणुका होणार रंगतदार, पनवेल तालुक्यात राजकीय पक्षांच्या मोर्चे बांधणीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 23:50 IST

Panvel : गावातील स्थानिक नेत्यांना आपला आवडीचा उमेदवार सरपंच म्हणून जाहीर करता येणार नाही.

-  वैभव गायकर

पनवेल : राज्यातील जवळपास १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी आरक्षण सोडत नुकतीच पार पडली आहे, परंतु राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेले आरक्षण रद्द केल्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. गावातील स्थानिक नेत्यांना आपला आवडीचा उमेदवार सरपंच म्हणून जाहीर करता येणार नाही. जाहीर झालेल्या सोडतीद्वारे ज्या ग्रामपंचायतींना इच्छुक आरक्षित उमेदवारांनी निवडणुकीसाठी कंबर कसून मोर्चे बांधणीला गावातील पुढाऱ्यासह सुरुवात केली होती. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेकापचा वरचष्मा होता. मात्र, मागील काही वर्षांपासून शेकाप मागे पडत  आहे. कधी नव्हे, ते विधानसभेला भाजपने ग्रामीण भागातून आघाडी घेतल्याने भाजप ग्रामीण भागात मजबूत बनत  आहे. राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या धर्तीवर पनवेलमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगल्यास ग्रामपंचायत निवडणुकीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. याकरिता स्थानिक पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना आदी पक्षाचा एकत्र यावे लागणार आहे.

खर्च कुणी करायचा?यावेळी आरक्षण हे निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार असल्याने, निवडणुकीचा खर्च कुणी करायचा, हा प्रश्न गावपातळीवर स्थानिक पुढाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सरपंच पदाची माळ कोणाच्याही गळ्यात पडू शकते. सरपंच पद कोणत्याही सदस्याला मिळू शकते.

या आहेत ग्रामपंचायतीबारवई, साई, सावळे, खानाव, वलप, आकुर्ली, हरिग्राम, खैरवाडी, नानोशी, पोसरी, खानावले, उमरोली, आपटा, पालीदेवद, कोळखे, सांगुर्ली, मोर्बे, उसर्ली खुर्द, पाले बुद्रुक, देवळोली, केवाळे, वाकडी, वाजे, वारदोली

टॅग्स :panvelपनवेलElectionनिवडणूक