शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक : वदप, गौरकामतमध्ये राष्ट्रवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:15 IST

तालुक्यातील वदप व गौरकामत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. ८१ टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुका पहिल्यांदाच थेट पद्धतीने झाल्या.

कर्जत : तालुक्यातील वदप व गौरकामत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. ८१ टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुका पहिल्यांदाच थेट पद्धतीने झाल्या. सोमवारी मतमोजणी झाली त्यामध्ये दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडून आले, तसेच वदप ग्रामपंचायतीत ९ पैकी ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आणि शिवसेनेला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले तर गौरकामत ग्रामपंचायतीत ९ पैकी ८ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने बाजी मारली. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.वदप व गौरकामत ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी कर्जत तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता सुरू झाली आणि ११ वाजता पूर्णही झाली. गौरकामत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगेश भाऊ देशमुख यांनी ९६८ मते मिळवून एकतर्फी निवडणूक जिंकली. त्यांनी धनाजी तानाजी रेवाळे यांचा ३२३ मतांनी पराभव केला तर गेल्या वर्षी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा तर्फे निवडणूक लढविलेल्या रमेश परशुराम चव्हाण यांना अवघी १२५ मते मिळाली त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुणाल चिंचोळे यांनी काम पाहिले त्यांना अनिल नागभिडकर आणि मेघा अंकमवार यांनी सहकार्य केले.वदप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक मात्र चुरशीची झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीरा ज्ञानेश्वर विचारे यांनी शिवसेनेच्या भीमा काशिनाथ उघडे यांचा अवघ्या ३७ मतांनी पराभव केला. विचारे यांना ६६० तर उघडे यांना ६२३ मते मिळाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे या आपल्या पोलीस कर्मचाºयांसह जातीने उपस्थित होत्या.या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजित अरविंद खैरे यांनी जबाबदारी पार पाडली तर त्यांना समीर अशोक पिंपळे आणि गणेश किशनराव मुंढे यांनी सहकार्य केले.

गौरकामत ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य -प्रभाग १किरण पवार (४१५)सुमन वाघमारे (३४५)अर्चना रोकडे (बिनविरोध)प्रभाग २संतोष गुरव (४८५)सागर देशमुख (३११)सुगंधा मिसाळ (४१७)प्रभाग ३शरद वाघमारे (२४५)मालती वाघमारे (२४९)समिधा गांगल (२६८)

वदप ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य-प्रभाग १आशा शिंदे (३७८)लीलाधर गायकवाड (२६१)मीना मुकणे (३४१)प्रभाग २सुनील पवार (२९४ )स्वाती पाटील (२७३)प्रिया पाटील (२८४)प्रभाग ३बाबल्या वाघचौरे (१४८)वर्षा व्होले (१५२)मनीषा पाटील (१५८)

 

टॅग्स :Karjatकर्जतgram panchayatग्राम पंचायतNCPराष्ट्रवादी काँग्रेस