शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:41 IST

नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

अलिबाग : नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल नेमका कोणत्या पक्षाकडे अधिक आहे, हे कळू शकेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच वर्षामध्ये पार पडणार आहेत. त्याच धामधूममध्ये जिल्ह्यातील ९७ ग्रमपंचायतींची मुदत मार्च ते जून २०१९ या कालावधीमध्ये संपत आहे. निवडणूक विभागाकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी २०१९ वर्षे हे निवडणुकांचे वर्ष आहे. मेमध्ये लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. रायगड जिल्ह्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ९७ ग्रमपंचायतींची मुदत येत्या मार्च ते जून या कालावधीमध्ये पूर्ण होत आहे. त्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील २५, मुरुड - ३, पेण- ५, पनवेल- ५, उरण-१, कर्जत- ३, खालापूर- १, माणगाव- ११, तळा- ५, रोहा- ६, महाड- १७, श्रीवर्धन- ११ आणि म्हसळा तालुक्यातील चार अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.सरपंचपदाची थेट निवडणूक सुरू झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष दक्ष झाले आहेत. त्यांनी राजकीय व्यूहरचनेमध्ये बदल करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. सरपंचाला असलेले भक्कम अधिकार, मतदारांमधून होणाऱ्या थेट निवडीमुळे सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी राजकीय पक्षातील उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच वाढली आहे. मतदारच आपल्या आवडीचा सरपंच थेट निवडून देत असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांना इच्छुकांचे मन वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकांकडे पाहिल्यास विविध राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर सोयीस्कर युत्या आघाड्या केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना चांगलेच यश आल्याने आगामी निवडणुकीसाठी हाच फॉर्म्युला राहण्याची शक्यता बळावली आहे. ग्रामपंचायतींमध्ये मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. १७ डिसेंबर २०१८ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे, असे निवडणूक विभागाचे रवींद्र मठपती यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड