शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कणसांनी डोईभार झाले भातपीक

By admin | Updated: September 12, 2016 03:23 IST

निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद

पेण : निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद उपभोगीत असताना देशाचा अन्नदाता बळीराजासुद्धा मनोमन आनंदी झाला. या आनंदाचे महत्त्वाचे कारण म्हणजे भातशेतीमध्ये कणस डोईभार झाली असून सध्या वाऱ्याच्या मंद झुळूकीबरोबर डोलू लागलीत. हलव्या प्रकारातील भात प्रजातीची ७० ते ९० टक्के दिवसांच्या कालावधीतील भाताला कणसं आली असून सध्या निपजलेल्या दाण्यामध्ये तांदूळ बनण्याची प्रक्रिया म्हणजे दूध भरणी सुरू आहे. जसजसा दाणा पक्व होईल तसतसा शिवाराचा हिरवा रंग सोनेरी रंगाचा पट्टा तयार होईल. अन्नपूर्णा शिवारावर प्रसन्न झाली असून विजयादशमीपर्यंत शिवारात सोने लुटायची प्रक्रिया सुरू होईल.शेतकरी बांधवांसाठी हवामानशास्त्र विभागाने गुड न्यूज दिली असून मान्सूनची परतीचा प्रवास सुरू होण्याची वेळ येवून ठेपली आहे. कोकण पट्ट्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली असून बहुतांशी आकश निरभ्र असेल. सध्या पहाटे पडणारं दव हे गर्भधारणा अवस्थेतील पिक व कणसांत दूध भरण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक औषधी मात्रा असल्याने पिकांवरील किडरोगांचे समूळ उच्चाटन करणारे आहेत. शिवारात पिकांचे ताटवे व माळरान गवतावर दवभार झालेल्या गवताच्या पाल्यावर मोत्यासारखे चमचमणारे दवबिंदू, दवांचा होणारा वर्षाव हा ऋ तू बदलनाच्या नैसर्गिक खुणा आहेत. येणारा नवरात्रोत्सवात आदिमायेच्या घटस्थापनेप्रसंगी शिवार धनधान्यांनी समृद्ध होणार आहे. यंदाचा मान्सून हंगाम पिकांसाठी शंभर टक्के अनुकूल झाल्याने वर्षा ऋ तूला निरोप देताना बाप्पाच्या अनंत चतुर्दशीनंतर, शिवारात लगबग वाढणार आहे.हलक्या जातीची भातपिकं परिपक्व झाल्यावर त्याची कापणी न मळणी (झोडणी) एकाचवेळी क रण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिटसारखे ऊन पडत असल्याने प्रसवलेली कणसं, दाणा भरणी व रंगरूप पालटण्यास कमी वेळ घेतात. (वार्ताहर)