शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडात रास्त भाव धान्य दुकानदार जाणार संपावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 01:06 IST

तसेच रेशन दुकानदारांची टेस्ट न केल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

विनोद भोईरपाली : नाडसूर, जांभूळपाडा येथील रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, जिल्हाधिकाऱ्यांनीही रास्त भाव धान्य दुकानदारांची कोरोना टेस्ट करण्यासाठी आदेश जारी केले होते. मात्र, तहसीलदारांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे सुधागड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे म्हणणे आहे, तसेच रेशन दुकानदारांची टेस्ट न केल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.सुधागड तालुक्यातील नाडसूर, जांभूळपाडा येथील रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, तसेच रेशनधारकांना रेशनिंग देताना येणारा नजीकचा थेट संपर्क यातून रेशनिंग दुकानदारांच्या कुटुंबाची कोविडसंदर्भात धास्ती वाढत आहे. रेशनिंग वितरण करताना ई-पास मशीनवर लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे घेताना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी ६ आॅगस्ट रोजी सर्व रेशन दुकानदारांची कोविड अँटिजेन टेस्ट करण्यासंबंधी आदेश जारी केले होते. परंतु सुधागड तालुका तहसीलदार आदेशाला केराची टोपली दाखविली. अद्यापपर्यंत सुधागडात एकाही रेशन दुकानदाराची कोविड टेस्ट तहसीलदार सुधागड यांच्याकडून केली नसल्याने, या सर्व बाबींचा विचार करता, संपावर जाण्याचा निर्णय सुधागड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने घेऊन, तसे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले आहे.।करोना टेस्टची किट उपलब्ध नसल्यामुळे टेस्टला उशीर होत आहे. आतापर्यंत तालुक्यात २५० टेस्ट केल्या आहेत. यामध्ये पोलीस, तहसील, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांतील कर्मचारी व अधिकारी यांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. बुधवार, १९ आॅगस्टपासून रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यात येतील.- दिलीप रायन्नवार,तहसीलदार, पाली, सुधागड