शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

सरकारी कामे फास्ट ट्रॅकवर

By admin | Updated: July 19, 2015 00:01 IST

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे अलिखित ब्रीदवाक्य आता इतिहासजमा होणार आहे. नव्या कायद्यामुळे सर्वसामान्यांचा हा त्रास आता संपणार आहे.

- आविष्कार देसाई,  अलिबाग‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे अलिखित ब्रीदवाक्य आता इतिहासजमा होणार आहे. नव्या कायद्यामुळे सर्वसामान्यांचा हा त्रास आता संपणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क २०१५’ अर्थात लोकसेवा कायद्याच्या अंमलबजावणीला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे सरकारी बाबूंच्या खाबूगिरीला लगाम लागण्याची शक्यता आहे.वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यासह अन्य दाखल्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित असणाऱ्या कार्यालयाबाहेर आपण सातत्याने गर्दी झालेली पाहतो. विविध दाखले प्राप्त करण्यासाठी नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात त्यात्या फायलींचा प्रवास सुरू होतो. सहा-सहा महिने खेटे घालून सुध्दा काम होत नाही. ज्या तारखेला बोलावतात, त्यावेळी हमखास ‘साहेब’ बाहेर गेलेले असतात. त्यामुळे होत आलेले काम पुन्हा रखडते. यासर्वांचा मनस्ताप होतोच, त्याचबरोबर वेळ आणि पैसाही वाया जातो. काही ठिकाणी फाईलचा प्रवास हा अर्थकारणासाठीही थांबविला जातो. सर्वसामान्यांची या जोखडातून सुटका करून घेण्यासाठी सरकारने लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतची प्रक्रिया सुरू केली असून सुरुवातीला यात १५ सेवांचा समावेश राहणार आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्याशी संपर्क साधला असता लोकसेवा कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण करून देणे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक केले आहे. संबंधित अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या मुदतीत काम केले नाही तर, संबंधिताला अपिलात जाता येणार आहे, असे अ‍ॅड. रत्नाकर पाटील यांनी सांगितले. कालमर्यादेमुळे आर्थिक गैरव्यवहारांना त्यानिमित्ताने आळा बसणार असल्याने निश्चितच हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.सरकारी अधिकाऱ्यांना कामासाठी कालमर्यादा दिल्याने त्यांना जास्तीचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर बंधने येण्याची भीती अधिकारीवर्गातून दबक्या आवाजात व्यक्त केली जाते.लोकसेवेचा तपशील कालमर्यादा (दिवस)वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र १५ जातीचे प्रमाणपत्र २१उत्पन्नाचे प्रमाणपत्र १५नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र २१तात्पुरता रहिवासी दाखला ७ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ७ऐपतीचा दाखला २१सांस्कृतिक परवाना ७अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत ७अल्प भूधारक दाखला १५भूमिहीन शेतमजूर दाखला १५शेतकरी दाखला १५डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचा दाखला ७प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे १प्रकल्पग्रस्त दाखला/वारसांना हस्तांतरण ३०कोयना प्रकल्पग्रस्त दाखला/वारसांना हस्तांतरण ३०