शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सरकारचा बोगस मच्छीमार संस्थांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:34 IST

या निर्णयामध्ये जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी व वसुली अधिकारी यांनाही चाप लावण्यात आला आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बोगस मच्छीमार संस्थांचे पितळ उघडे पडल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. कोट्यवधी रुपये थकविणाऱ्या संस्थांना काळ्या यादीत टाकावे, अशा संस्थांना कोणतेही सरकारी लाभ देण्यात येवू नयेत, डिझेल कोटा मंजूर करू नये, ज्या नौकांसाठी कर्ज दिले आहेत त्या नौका तारण म्हणून ठेवण्यात याव्यात अशा स्वरूपाचे कडक आदेश सरकारने मत्स्य विभागाला दिलेआहेत.राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे रायगडमधील मच्छीमार संस्थांच्या बोगस कारभाराबाबत १९ एप्रिल रोजी आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी तक्र ार दाखल केली होती. त्या तक्र ारीची गंभीर दखल घेत सरकारने २ मे रोजी शासन निर्णय काढून बोगस संस्थांना चाप लावण्याचे काम केले आहे.उरण तालुक्यातील काही मच्छीमार संस्थाच अस्तित्वात नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर फौजदारी कारवाई व गुन्हे दाखल करण्याची मागणी सावंत यांनी केली होती. त्यानंतर दर्यासागर मच्छीमार संस्थेमधील ६० लाख रुपयांच्या अपहाराबाबत उरण पोलीस ठाण्यात २८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.काही संस्था सरकारकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम मोठ्या प्रमाणावर थकवतात. त्यानंतर सदरची संस्था बंद करतात. तेच सभासद दुसºया नावाने संस्था स्थापन करून सरकारी निधी लाटण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे प्रत्यक्षात छोट्या, गरजू मच्छीमारांना कर्जवाटप करण्यात अडचणी येतात. त्यामुळे यापुढे नियमित कर्ज व त्यावरील व्याजाच्या थकबाकीच्या हप्त्याची संख्या तीन झाल्यास परवाना अधिकाºयांनी थकीत कर्जदाराचा मासेमारी करण्याचा परवाना रोखून धरावा.कर्जदाराचे कौल (व्हीआरसी) ताब्यात घ्यावे, आवश्यक तेथे वसुलीसाठी पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. तसेच थकबाकीदार संस्था यांच्याविरुध्द महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे अधिकार मत्स्यविभागास प्रदान करण्यात आले आहेत.या निर्णयामध्ये जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी व वसुली अधिकारी यांनाही चाप लावण्यात आला आहे. या अधिकाºयांची विहित वसुली ७५ टक्के इतक्या प्रमाणानुसार असेल तरच त्यांची कार्यतत्परता व पदोन्नतीबाबत विशेष नोंद घेण्यात यावी, असेही निर्देश सरकारने दिले आहे. त्यामुळे बोगस मच्छीमार संस्थांबरोबरच अधिकाºयांचेही धाबे दणाणले आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमार